कापसाच्या बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 03:26 PM2019-11-11T15:26:31+5:302019-11-11T15:28:00+5:30

अवकाळी पावसाने आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणाम झाल्याने मुक्ताईनगरच्या कापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे.

Shuttin 'on the cotton market | कापसाच्या बाजारपेठेत शुकशुकाट

कापसाच्या बाजारपेठेत शुकशुकाट

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणामकापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावटतीन हजार ८०० ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदीयावर्षी कपाशीची पेरणी तालुक्यात २२ हजार हेक्टरवर, परंतु अवकाळी पावसाने झाले नुकसान

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : अवकाळी पावसाने आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनावर जबर परिणाम झाल्याने मुक्ताईनगरच्या कापसाच्या खाजगी बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. त्याची तुरळक आवक पाहता बाजारात प्रतवारीचे निकष लावून तीन हजार ८०० ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे.
खान्देशातील अग्रगण्य अशा या बाजारपेठेत हजारावर मजुरांच्या हाताला काम मिळायचे आणि व्यापार कोटीच्या घरात असायचा. यंदा मात्र आवक नसल्याने कापूस खरेदीच्या परंपरागत मजुरांना रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे, तर नोव्हेंबरमध्ये गजबजणाºया या बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.
यावर्षी कपाशीची पेरणी तालुक्यात २२ हजार हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील कापसाच्या खासगी बाजारपेठेत नवरात्रच्या मुहूर्तावर कापूस खरेदी मुहूर्त साधणाºया या बाजारपेठेत दसºयापासून कापसाची आवक जोरदार असायची आणि आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खरेदीला सुगीचे दिवस असायचे. दररोज हजार ते दीड हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी व्हायची. यंदा परतीच्या पावसाने अशी मार दिली की कापासाचे बोंडदेखील नवरात्रोत्सव काळात शेतकºयांच्या घरात आले नाही. त्यामुळे एकाही व्यापाºयाने नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधला साधला नाही. दिवाळीच्या काळात येथील व्यापाºयांनी तुरळक प्रमाणात येणाºया कापसावर खरेदी सुरू केली. कापसाची आवक पाहता व्यापाºयांचा दैनंदिन खर्चही निघत नाही. दिवसभरात संपूर्ण शहरात फक्त २५ ते ३० क्विंटलची आवक आहे, तर तालुक्यात ही आवक १०० ते १५० क्विंटलच्या घरात आहे.
एकंदरीतच अवकाळी पावसाने कापसाचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात घटविल्याने येथील बाजारपेठेच्या इतिहासात प्रथमच इतकी मंदी आहे. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. शेतकरी उत्पादनाअभावी हवालदिल झाले आहे तर कापसाच्या बाजारपेठेतील पूर्ण अर्थ चक्र कोलमडले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही.
दुसरीकडे शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही, यावर्षीची खरेदी १५ नोव्हेंबरनंतरच सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा
धाग्याच्या लांबीनुसार शासनाने यावर्षी कपाशीची आधारभूत किंमत ठरविली आह. आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रति क्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत.

Web Title: Shuttin 'on the cotton market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.