अभाविपच्या प्रदेशमंत्री म्हणून सिद्धेश्वर लटपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:11+5:302021-02-06T04:27:11+5:30

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशमंत्री म्हणून सिद्धेश्वर लटपटे यांची निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या पुणे येथील प्रदेश ...

Siddheshwar Latpate as Abhavip's state minister | अभाविपच्या प्रदेशमंत्री म्हणून सिद्धेश्वर लटपटे

अभाविपच्या प्रदेशमंत्री म्हणून सिद्धेश्वर लटपटे

Next

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशमंत्री म्हणून सिद्धेश्वर लटपटे यांची निवड करण्यात आली आहे.

अभाविपच्या पुणे येथील प्रदेश कार्यालयातील निर्वाचन अधिकारी गंगाधर खेडकर यांनी ही निवड घोषित केली आहे. सिद्धेश्वर लटपटे मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील कार्यकर्ते आहेत. त्यांनी पत्रकारिताचे शिक्षण घेतले आहे. २०१३ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने केली आहे. आतापर्यंत त्यांनी शहर मंत्री, परभणी एसएफडी प्रमुख, लातूर महानगर मंत्री, प्रदेश सहमंत्री अशा जबादा-या सांभाळल्या आहेत. सध्या जळगाव विभाग संघटनमंत्री अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. वर्ष २०२०-२१ साठी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून त्यांची निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड येथे होणा-या ५५ व्या प्रदेश अधिवेशनात निर्वाचित प्रदेश मंत्री पदभार स्वीकारणार आहे.

Web Title: Siddheshwar Latpate as Abhavip's state minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.