तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:35 PM2019-07-29T22:35:39+5:302019-07-29T22:35:47+5:30

  भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून ...

Siege of six villages in Raver taluka of Tapi | तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

तापीचा रावेर तालुक्यातील सहा गावांना वेढा

googlenewsNext

 





भुसावळ/रावेर/ऐनपूर/वरणगाव : तापी नदीला आलेल्या महापूराने रूद्रावतार धारण केला असून बºहाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी महापूराच्या प्रभावित गावांना भेटी देऊन नदीकाठालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून संबंधित तलाठी व ग्रामसेवक तथा मंडळाधिकारी यांना मुख्यालयावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्याने भुसावळ परिसरातही नदी पात्रात प्रचंड प्रवाह दिसत आहे.
रावेरसह तापी काठच्या गावांना रविवारी रात्री तसेच सोमवारी पाऊस सुरू होता. रावेर तालूक्यात रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत व पुन्हा सायंकाळी झडी सुरूच होती. रावेर तालूक्यात सरासरी ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
तापी-पूर्णाला पूर
तापी व पुर्णा नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पहाटे ८ वाजता व त्यानंतर ६४० मि. मी. पावसाची नोंद झाल्याने तापी नदीला महापूर आला. बºहाणपूर इंदूर, अमरावती महामार्गावरील जून्या पुलावरून सुमारे दोन ते तीन पुरूष वरून पाणी वाहत होते.
सहा गावांना वेढा
या पुरामुळे रावेर तालूक्यातील नेहता, खिरवड, निंभोरासीम,विटवे, निंबोल, ऐनपूर या सहा गावांना तापी नदीतील महापूराच्या बॅकवॉटरचा वेढा पडला असून रावेरशी संपर्क तुटला आहे.

हतनूरचे ४१ दरवाजे उघडले
४हतनूर धरणाची पुर्ण ४१ दरवाजे उघडून २ लाख १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होवूनही तापीच्या महापूराचा रूद्रावतार रात्री उशिरापर्यंत कायम राहण्याची शक्यता हतनूर प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता एम. पी. महाजन यांनी व्यक्त केली. दरम्यान, तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागा बुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे.
काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
४तापी नदीकाठच्या बाधित गावातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासारखी बिकट परिस्थिती नसली तरी संबंधित रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून तलाठी व ग्रामसेवक यांना मुख्यालयावर हजर राहण्याची सक्त ताकीद तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी दिली आहे.
४तापी नदीला मोठा पूर आल्याने भुसावळ परिसरातही काही गावांना सतर्कतेच्या सूचना आहेत. हा पूर पहाण्यासाठीं रावेरकडे जाणाºया पुलावर भुसावळकरांची गर्दी झाल्याचे दिसत होते.

 

Web Title: Siege of six villages in Raver taluka of Tapi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.