जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

By विलास बारी | Published: January 7, 2024 04:19 PM2024-01-07T16:19:16+5:302024-01-07T16:19:27+5:30

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा संपन्न आहे.

Sighting of striped tiger in Yaval sanctuary of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

जळगाव: यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवरील जंगलामध्ये दि. ६ रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे २०२१ नंतर दुस-यांदा पट्टेदार वाघाचे अस्तित्व मिळून आले आहे.

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा संपन्न आहे. मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे किंवा मादी, तसेच त्याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली आहे.
 

Web Title: Sighting of striped tiger in Yaval sanctuary of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.