माता मृत्यू दरात लक्षणीय घट! दुर्गम भागातील आशा, आरोग्य सेविकांच्या सेवेचे फलित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 07:01 PM2023-12-14T19:01:50+5:302023-12-14T19:09:32+5:30

मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याची माहिती

Significant reduction in maternal mortality! Hope in the remote areas, the results of the service of health workers | माता मृत्यू दरात लक्षणीय घट! दुर्गम भागातील आशा, आरोग्य सेविकांच्या सेवेचे फलित

माता मृत्यू दरात लक्षणीय घट! दुर्गम भागातील आशा, आरोग्य सेविकांच्या सेवेचे फलित

कुंदन पाटील, जळगाव: जिल्ह्यातील माता मृत्यू दरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.२०२२-२३ मध्ये ४१ माता मुत्यू झाल्या होत्या. एप्रिल २३ ते नोव्हेंबर २३ या आठ महिन्यात ११ माता मुत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाबरोबरच दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांची कामाप्रती निष्ठा व समर्पण वृत्ती यामुळे मातांची प्रसुती वेळेवर व सुरळीत करणे शक्य झाले. याकारणाने माता मुत्युदरात लक्षणीय घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका पावसाळ्याच्या दिवसांत तापीला पूर आलेला असतांनाही जीवाची पर्वा न करता प्रसूतीसाठी नदी ओलांडून गाव-पाड्या वस्त्यांवर पोहचतात. यामुळे मातांची प्रसूती वेळेवर होते. यातून महिलांचा मृत्यू ही ओढावत नाही. अमळनेर तालुक्यातील सात्री येथे पुराचा वेढा असतांनाही पोलीस पाटलांच्या मदतीने वैद्यकीय पथकाने जीवाची पर्वा न करता बाळ व बाळंतिणीचा जीव वाचविण्याची घटना मागील काही महिन्यांपूर्वीच घडली आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी‌ डॉ.विवेकानंद बिराजदार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे यांच्या पथकाने सातपुड्याच्या जामन्या - गाडऱ्या सारख्या असंख्य दुर्गम पाड्यांवर भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेतला आहे.

७ तालुक्यांना बुस्टर

मानव विकास कार्यक्रम जिल्ह्यात ७ तालुक्यामध्ये (अमळनेर, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर) राबविण्यात येतो, यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक महिन्यात २ शिबीर घेवून बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांकडून गरोदर माता व बालकांची तपासणी करण्यात येते. यामध्ये गरोदर मातेला प्रसुती आधी २ हजार रूपये व प्रसुती नंतर २ हजार रुपये अशी एकूण ४ हजार बुडीत मजुरी दिली जाते.  अतिदुर्गम भागात भेटी देवून कार्यक्रमाचे संनियत्रण, मुल्यमापन करून मार्गदर्शन केले जाते. अति जोखमीच्या मातांची यादी करुन त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो.

तीन वर्षातील माता मृत्यूची संख्या

वर्ष-मनपा क्षेत्र-ग्रामीण

  • २०२०-२९-०८-२१
  • २०२१-४०-२४-१६
  • २०२२-२३-४१-३३-८
  • एप्रिल ते नोव्हेंबर २०२३-११-०६-०५


आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांनी समर्पित भावनेने केलेल्या सेवेमुळे मृत्यू दर घटला आहे. याचे नक्कीच समाधान आहे.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

Web Title: Significant reduction in maternal mortality! Hope in the remote areas, the results of the service of health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव