तापीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

By admin | Published: August 25, 2015 10:25 PM2015-08-25T22:25:25+5:302015-08-25T22:25:25+5:30

उपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

Signs of struggle with tap water | तापीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

तापीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

Next

रमाकांत पाटील नंदुरबार
उपसा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात उदासीन असलेल्या पाटबंधारे विभागाने तापीवरील प्रकल्पातील पाणी अडविण्याबाबतही आडमुठे धोरण स्वीकारल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या दुष्काळाचे सावट असताना प्रकल्पात पाणी अडविले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून, प्रशासन व शेतक:यात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
तापी नदीवर जिल्ह्यात सारंगखेडा आणि प्रकाशा येथे प्रकल्प बांधण्यात आले आहेत. यापूर्वी याठिकाणी उपसा योजना राबविण्यात आल्या होत्या. परंतु या योजना पूर्ण होताच तापी नदी हंगामी वाहू लागल्याने उपसा योजनेचा फायदा शेतक:यांना झाला नाही. उलट माथी कर्ज झाले. या पाश्र्वभूमीवर प्रकल्पांना मंजुरी मिळून रडतखडत या प्रकल्पांची कामे चार वर्षापासून पूर्णत्वास आली आहेत. प्रकल्प पूर्ण झाल;े पण उपसा योजना बंद पडल्या. त्यामुळे जवळपास 400 कोटींपेक्षा अधिक खर्च होऊनही सारंगखेडा आणि प्रकाशा या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश तूर्त तरी साध्य झालेला नाही.
अशा स्थितीत या प्रकल्पांमध्ये अडविलेले पाणी शेतकरी आपापल्या खर्चाने आपल्या शेतार्पयत नेऊन उत्पन्न वाढविण्याची धडपड करीत आहेत. यंदा महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतात जेमतेम जगलेली पिके करपू  लागली आहेत. अशा स्थितीत शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी प्रय} करीत आहे. परंतु तापी काठावरील चित्र मात्र भयानक आहे.
वास्तविक पाऊस नसल्याने व दुष्काळाची चर्चा सुरू झाल्याने  प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी प्रय} होणे अपेक्षित होते. परंतु पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे तापीतील पाणी गुजरातमध्ये वाहून जात आहे.
सद्य:स्थितीत सारंगखेडा ते प्रकाशादरम्यान तापी नदीचे पात्र कोरडे होऊ लागले आहे. प्रकाशा प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी प्रय} न झाल्याने पाणी गुजरातमध्ये वाहून गेले. परिणामी पात्र कोरडे झाल्याने यादरम्यान असलेल्या शेतक:यांना पिकांना पाणी देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी पाणी अडविण्यासाठी प्रकाशा प्रकल्पाधिका:यांकडे तगादा लावत आहेत.
दुसरीकडे या प्रकल्पातील पाणी अडविण्यासाठी जरी प्रय} झाला तरी आता वरून पाणी सोडण्यासाठीही प्रयत्न करावा लागणार आहे. सारंगखेडा, सुलवाडे आणि हतनूर धरणातून पाणी सोडल्यास प्रकाशा बॅरेजमध्ये पाणीसाठा होऊ शकतो. पण सध्या तरी पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्यतेमुळे प्रकाशा बॅरेज ठणठणाट आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांविरुद्ध असंतोष व्यक्त होत असून, त्याबाबत गावोगावी बैठकाही होत आहेत.
यासंदर्भात काही शेतक:यांनी जिल्हाधिका:यांकडे धाव घेतली असून, संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.    

Web Title: Signs of struggle with tap water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.