नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी जामनेरला मूकमोर्चा व धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 04:55 PM2019-12-13T16:55:27+5:302019-12-13T16:57:28+5:30

नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी जामनेरला मूकमोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले.

Silence and agitation for Jamner demanding the repeal of the Citizen's Research Bill | नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी जामनेरला मूकमोर्चा व धरणे आंदोलन

नागरिक संशोधन विधेयक रद्दच्या मागणीसाठी जामनेरला मूकमोर्चा व धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देमोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकांद्वारे मागण्यांचा उल्लेख जामनेर तहसीलदारांना दिले निवेदनमोर्चात चार हजार मुस्लीम बांधव व विधेयकाला विरोध असणारे नागरिक सहभागी

जामनेर, जि.जळगाव : नागरिक संशोधन विधेयक मुस्लीम समाजाला इतर समुदायापासून दूर करण्याची शक्यता असून देशात पहिल्यांदाच नागरिकतेसाठी धार्मिकतेला प्राधान्य दिले जात आहे. समाजाला तोडू पाहणारे विधेयक रद्द करावे या मागणीचे निवेदन येथील जमीअत ए उलमाएय हिंद संघटनेकडून शुक्रवारी तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, विधेयकामुळे देशात संशय व विद्वेशाचे वातावरण निर्माण होईल. असंविधानिक व अमानवीय विधेयक रद्द करावे. संघटनेकडून जिकरा शाळेपासून मूकमोर्चा काढण्यात आला. शिस्तीत निघालेल्या या मोर्चात सुमारे चार हजार मुस्लीम बांधव व विधेयकाला विरोध असणारे नागरिक सहभागी झाले होते.
तहसील कार्यालयासमोर मौलाना इम्रान मजाहीरी, राजू खरे, मौलाना इरफान यांनी मार्गदर्शन केले. निवेदन राष्ट्रपती यांना पाठवावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
मोर्चेकऱ्यांच्या हातात फलकावर संविधान बचाओ, एक देश, एक मानवता धर्म, हमारी मांग ईन्साफ की है, बराबरी की है, समाज बाटनेकी साजीश है, धमोर्मे बटवारे की साजीश नही चलेगी या घोषणा होत्या. यावेळी कलीम मौलाना, हाफीस इरफान मौलाना, हाफिस अब्दुल करीम मौलाना, हाफिस ईब्राहिम मौलाना, डॉ.इम्तियाज खान, सय्यद मुश्ताक अली, उपनगराध्यक्ष अनिस शेख, एल. एस .खान, बबलू खान, रिजवान शेख, नाजिम शेख, खलील खान, आसिफ शेख, नुरू शेख, फारूक मणियार, जाकीर खान, रफिक शेख, शंकर राजपूत, प्रदीप गायके, राजू खरे, अशफाक पटेल, हाफिस मुजावर, जमील खान, जावेद मुल्लाजी, युनूस खान, शरीफ मंसुरी, शराफत अली, तयारखान, अजमुद्दीन शेख, रहीम ठेकेदार , अनवर पहेलवान, वसीम शेख, अनीस पठान, जलील शेख, निहाल पहेलवान, आदी समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक निरीक्षक राजेश काळे, धरमसींग सुंदरडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Silence and agitation for Jamner demanding the repeal of the Citizen's Research Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.