जळगावात मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:45 PM2018-03-20T12:45:09+5:302018-03-20T12:45:09+5:30

गाळेधारकांचा आजपासून बंद

A silent march on the collector's office | जळगावात मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जळगावात मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

Next
ठळक मुद्देविविध संघटनांचा पाठिंबाकोट्यवधींची उलाढाल ठप्पमोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १९ - शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील गाळेधारक संतप्त झाले असून न्याय मिळावा यासाठी मंगळवार, २० पासून गाळेधारकांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. शासनाने तत्काळ दखल घ्यावी यासाठी सकाळी ११ वाजता कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवित आपले दुकाने बंद ठेवली, त्यामुळे जळगावातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
टॉवर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
जिल्हा व्यापारी महामंडळाकडून आस्थापना बंद
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने गाळेधारकांचा प्रश्न लक्षात घेऊन मूक मोर्चाला पाठिंबा दिला असून, मंगळवारी दुपारपर्यंत आस्थापना बंद ठेवण्यात आल्या.
या आहेत मागण्या
रेडीरेकनरच्या नियमानुसारच प्रचलित भाडेआकारणी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मनपा गाळेधारक कोअर कमिटीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोट्यवधीची उलाढाल ठप्प
शहरातील मुख्य १८ मार्केट बंद राहणार असल्याने, या मार्केटमधून होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. फुले मार्केट हे शहरातील कपडा मार्केट म्हणून खान्देशात प्रसिध्द आहे. या मार्केटसह इतर मार्केटदेखील बंद राहणार आहे. प्रशासनाकडून गाळेधारकांच्या हिताचा निर्णय न झाल्यास गाळेधारकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे
मोर्चा दरम्यान जळगावकरांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत सर्व खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली. तसेच मनपा कोअर कमिटीचे सर्व सदस्य प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मोर्चात सहभागी झाले. काही जणांनी काळ््या फिती लावलेल्या होत्या.
 

Web Title: A silent march on the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.