जळगावात ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 05:01 PM2018-01-24T17:01:29+5:302018-01-24T17:06:02+5:30
धुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करा
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२४ : धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस.बी.वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे बुधवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातील ८२९ जणांनी सहभाग घेत जिल्हाधिकाºयांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
बुधवारी दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा टॉवर मार्गे नेहरू पुतळा, शिवाजी पुतळा, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाला. याठिकाणी पोलिसांनी मोर्चातील शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडले. जिल्हाध्यक्ष संजीव निकम, जिल्हा सचिव संजय भारंबे यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी निवेदन दिले.