भाववाढीमुळे चांदी पुन्हा ६६ हजारांच्यापुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:58+5:302021-04-06T04:14:58+5:30
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढ होऊन चांदी दहा दिवसानंतर ...
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढ होऊन चांदी दहा दिवसानंतर पुन्हा ६६ हजारांच्या पुढे गेली आहे. सोन्याचे भावदेखील ४६ हजारांच्या पुढे गेले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहे. यामध्ये दहा दिवसांपूर्वी तर चांदी ६६ हजारांच्या खाली तर सोने ४६ हजारांच्या खाली आले होते.
दिनांक २६ मार्च रोजी चांदीत ६०० रुपयांनी घसरण होऊन ती ६५,७०० रुपयांवर आली होती. अडीच महिन्यानंतर चांदी ६६ हजार रुपयांच्या खाली आली होती. काही दिवस थोडाफार चढ-उतार होत राहून आता चांदीचा भाव पुन्हा वाढून सोमवारी ते ६६,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
अशाचप्रकारे सोन्याच्या भावातही घसरण होऊन दहा दिवसांपूर्वी साेने ४६ हजार रुपयांच्या खाली आले होते. त्यामुळे सोन्याचे भाव ४५,६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. त्यानंतर सोन्याच्या भावात वाढ होऊन आता दर ४६ हजार शंभर रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.