चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराची वाढ, सोनेही १०० रुपयांनी वधारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 10:10 AM2021-07-06T10:10:55+5:302021-07-06T10:12:11+5:30

जून महिन्यातील पहिल्या आठवड्याचा अपवादवगळता सातत्याने घसरण होत गेलेल्या सोने-चांदीच्या दरामध्ये जुलै महिन्याची सुरुवात होताच भाववाढ सुरू झाली होती. 

Silver also rose by Rs 1,000 and gold by Rs 100 | चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराची वाढ, सोनेही १०० रुपयांनी वधारलं

चांदीच्या भावात पुन्हा एक हजाराची वाढ, सोनेही १०० रुपयांनी वधारलं

Next

जळगाव : चार दिवसांपूर्वी दरवाढ झालेल्या चांदीच्या भावात सोमवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात १०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. 

जून महिन्यातील पहिल्या आठवड्याचा अपवादवगळता सातत्याने घसरण होत गेलेल्या सोने-चांदीच्या दरामध्ये जुलै महिन्याची सुरुवात होताच भाववाढ सुरू झाली होती. 
यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी चांदीने ७० हजारांचा टप्पा ओलांडला होता. २ जुलै रोजी मात्र त्यात ५०० रुपयांची घसरण होऊन ती ७०  हजार रुपये प्रतिकिलोवर आली.  आता   आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार, ५ जुलै रोजी चांदीत पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर 
पोहोचली. 

अशाच प्रकारे सोन्याचेही भाव जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढत असून, ५ जुलै रोजी त्यात पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन ते ४८ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने चांदीला मागणी वाढत आहे.

Web Title: Silver also rose by Rs 1,000 and gold by Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.