चांदी ८९ हजारांच्या आत, दोन आठवड्यात ५,५०० रुपयांनी घसरली
By विजय.सैतवाल | Published: June 14, 2024 09:56 PM2024-06-14T21:56:48+5:302024-06-14T21:57:08+5:30
मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. त्यात २९ मे रोजी तर चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी-कमी होत गेले.
जळगाव : गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण सुरू असून शुक्रवार, १४ जून रोजी ८०० रुपयांची घसरण होऊन ती ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. दोन आठवड्यात तर चांदीचे भाव पाच हजार ५०० रुपयांनी कमी झाले आहे.
मे महिन्यात चांदीचे भाव सतत वाढत जाऊन चांदीने नवनवीन उच्चांक गाठले. त्यात २९ मे रोजी तर चांदी ९४ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली होती. त्यानंतर मात्र तिचे भाव कमी-कमी होत गेले. काहीसा चढ-उतार होत असताना ८ जूनपासून तिचे भाव सतत कमी होत आहे. ८ जून रोजी ९२ हजार २०० रुपयांवर असलेल्या चांदीचे भाव १० जून रोजी ८९ हजार ३०० रुपयांवर आले. आता पुन्हा १४ रोजी त्यात ८०० रुपयांची घसरण झाली व चांदी ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले आहे.
९४ हजारांवर गेलेल्या चांदीच्या भावात आता मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपासून सोने मात्र ७२ हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.