चांदीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, ३८ हजारावर भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:00 PM2020-03-20T13:00:01+5:302020-03-20T13:00:33+5:30

सोन्यातही ६०० रुपयांनी घसरण

Silver fell for the third consecutive day, hitting 3,000 | चांदीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, ३८ हजारावर भाव

चांदीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण, ३८ हजारावर भाव

googlenewsNext

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी-कमी होत असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून चांदीचे भाव सलग तिसºया दिवशी घसरले. गुुरुवारी चांदीत एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४१ हजार ६०० रुपयांवरून ४१ हजार रुपये प्रती तोळ््यावर आले.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी घटत असल्याने सोने-चांदीचे भाव कमी होत आहे. यात गुरुवारी चांदीत तर सलग तिसºया दिवशी घसरण झाली. यामध्ये मंगळवार, १७ मार्च रोजी अडीच हजाराची घसरण झाली होती. त्यानंतर बुधवार, १८ रोजी पुन्हा एक हजार रुपयांची व गुरुवार, १९ रोजी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ३८ हजार रुपये प्रती किलोवर आली. गेल्या आठवड्यातही १४ मार्च रोजी चांदीच्या भावात थेट ३५०० रुपयांनी घसरण झाली होती.
सोनेही ६०० रुपयांनी कमी
गुरुवार, १९ मार्च रोजी सोन्याच्याही भावात ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण होऊन सोने ४१ हजार ६०० रुपयांवरून ४१ हजार रुपये प्रती तोळ््यावर आले.
मागणी कमी होत तर आहेच सोबतच गेल्या महिनाभरापासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ज्या प्रमाणात भाव वाढले ते ३० टक्क्यांने कमीच होतात, असा अनुभव असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळेदेखील हे भाव कमी होत आहे.
जागतिक पातळीवर सोने-चांदीची मागणी कमी होत तर आहेच, सोबतच ज्या प्रमाणात या धातूंचे भाव वाढले त्याप्रमाणे ते कमी होत आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.

Web Title: Silver fell for the third consecutive day, hitting 3,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव