अधिक मासात मागणी वाढल्याने चांदीला चकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:38 PM2018-05-23T12:38:08+5:302018-05-23T12:38:08+5:30

सोने घसरले

Silver higher demand for more supplies | अधिक मासात मागणी वाढल्याने चांदीला चकाकी

अधिक मासात मागणी वाढल्याने चांदीला चकाकी

Next
ठळक मुद्देविदेशातून चांदीची आवक घटलीएकाच दिवसात थेट ५०० रुपये प्रति किलोने वाढ

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - अधिक मासामुळे चांदीला मागणी वाढल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात प्रति किलो ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शनिवारी सुवर्ण बाजार बंद झाला त्या वेळी ४१ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी सोमवारी ४१ हजार ५०० रुपयांवर पोहचली तर मंगळवारीदेखील हेच भाव स्थिर राहिले.
दरम्यान, अमेरिकेने सोन्यातील गुंतवणूक कमी केल्याने सोन्याचे भाव आठवडाभरापासून घसरतच असून सोन्याचे भाव प्रति तोळा ५०० रुपयांनी घसरुन मंगळवारी ते ३१ हजार ४०० रुपयांवर आले.
दोन महिन्यात अडीच हजार रुपयांनी वाढ
भारतात ब्राझील, लंडन येथून चांदीची आवक होत असते. गेल्या काही महिन्यांपासून चांदीची आवक घटली असून त्यामुळे भावात सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात ३९ हजार रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या भावात वाढ होत जाऊन मार्च अखेर ती ३९ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतरही वाढ कायम राहत एप्रिल महिन्यात अक्षय्यतृतीयेपूर्वीच चांदी ४० हजारावर पोहचली व त्यानंतर एप्रिल अखेर ४१ हजाराचा टप्पा चांदीने गाठला. मे महिन्यातही ४१ हजारावर असलेल्या चांदीच्या भावात २१ मे रोजी थेट ५०० रुपयांनी वाढ होऊन दोन महिन्यात अडीच हजार रुपये प्रति किलोने चांदीचे भाव वधारले आहे.
अधिक मासामुळे वाढली मागणी
एकतर आवक कमी असल्याने भाव वाढत असताना अधिक मासात चांदीची मागणी वाढली आहे. तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासामध्ये तांब्याच्या भांड्यासह चांदीचेही भाडे देण्याची प्रथा आहे. त्यानुसार यंदाही चांदीची मागणी वाढली आहे. नेहमीपेक्षा चांदीची विक्री साधारणपणे ३० टक्क्याने वाढली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाच दिवसात थेट ५०० रुपये प्रति किलोने वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
सोन्यात घसरण
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात मात्र आता सतत घसरण होत आहे. अमेरिकेने सोन्यातील गुंतवणूक थांबवून ती शेअर मार्केटकडे वळविल्याने सोन्याचे भाव घसरत आहे. या सोबतच अमेरिकन संसदेने करांसंदर्भात निर्णय घेतल्याने त्याचाही परिणाम सोन्यावर होऊन भारतीय बाजारपेठेवरही त्याचे परिणाम जाणवत आहे. त्यामुळे १४ मे रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होत जावून ते ३१हजार ४०० रुपये प्रति तोळ््यावर आले आहे.

चांदीची आवक घटल्याने भावात वाढ होत आहे. आता अधिक मासामुळे चांदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढीत भर पडत आहे. सोन्याच्या भावात गेल्या आठवड्यापासून १०० ते १५० रुपयांनी घसरण होत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Silver higher demand for more supplies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.