चांदीच्या भावात एक हजार रुपयांची घसरण, सट्टा बाजाराचा परिणाम
By विजय.सैतवाल | Updated: May 6, 2023 17:14 IST2023-05-06T17:13:42+5:302023-05-06T17:14:21+5:30
सोनेही ८०० रुपयांनी घसरले

चांदीच्या भावात एक हजार रुपयांची घसरण, सट्टा बाजाराचा परिणाम
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शुक्रवारी उच्चांकी भावावर पोहचलेल्या चांदीच्या भावात शनिवार, ६ मे रोजी एक हजार रुपयांची घसरण होऊन ती ७६ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात ८०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
सलग चार दिवस भाववाढ होत गेलेल्या सोने-चांदीचे भाव शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाढले होते. सोन्याने ६२ हजारांचा टप्पा ओलांडत ते ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते. तसेच चांदी ७७ हजार ८०० रुपये या उच्चांकी भावावर पोहचली होती. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून अचानक या मौल्यवान धातूंची विक्री वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले. त्यामुळे शनिवारी एकाच दिवसात चांदी एक हजार रुपयांनी घसरली. तसेच सोनेही ८०० रुपयांनी कमी झाले.