चांदीच्या भावात ७०० रुपयांनी वाढ; सोने २०० रुपयांनी घसरले, रुपयातील चढ-उताराचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 00:19 IST2020-11-12T00:19:00+5:302020-11-12T00:19:14+5:30
सोने २०० रुपयांनी घसरले, रुपयातील चढ-उताराचा परिणाम

चांदीच्या भावात ७०० रुपयांनी वाढ; सोने २०० रुपयांनी घसरले, रुपयातील चढ-उताराचा परिणाम
जळगाव : मंगळवारी तीन हजार ७०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात बुधवारी ७०० रुपयांनी वाढ होऊन ती ६४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. दुसरीकडे मात्र सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
गेल्या १० दिवसांपासून वाढ होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी घसरण झाली होती. त्यामुळे सोने ५२ हजार ९०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार ४० रुपयांवर आले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारीदेखील त्यात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
चांदीतही मंगळवारी तीन हजार ७०० रुपयांनी घसरण होऊन ती ६७ हजारांवरून ६३ हजार ३०० रुपयांवर आली होती. मात्र बुधवारी चांदीत ७०० रुपयांनी वाढ होऊन ती ६४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.अमेरिकेतील सत्तांतर व रुपयातील चढ-उतारामुळे हे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.