घसरणीनंतर चांदीत पुन्हा ५०० रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:58 AM2020-06-10T05:58:03+5:302020-06-10T05:58:11+5:30

सोनेही ३०० रु पयांनी वधारले : बाजारात खरेदीचा उत्साह

Silver rises again by Rs 500 after falling | घसरणीनंतर चांदीत पुन्हा ५०० रुपयांची वाढ

घसरणीनंतर चांदीत पुन्हा ५०० रुपयांची वाढ

Next

जळगाव : लॉकडाऊन - ४ नंतर अनलॉक-१ मधील दुसऱ्या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर दुसºयाच दिवशी दीड हजार रुपये प्रतिकिलोने घसरण झालेल्या चांदीच्या दरात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी ४९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. तसेच ८०० रु पये प्रतितोळ्याने घसरण झालेल्या सोन्याच्या दरातही ३०० रु पयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. लॉकडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांत चांदीचे दर ११ हजार रु पये प्रतिकिलोने वाढून ते ५० हजार रुपयांवर पोहराचले होते. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत मोड येत नव्हती. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन दर वाढले होते.

लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चकाकी आली व ती थेट ५० हजारांवर पोहोचली. सोन्याचेही दर अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दुसºया दिवशी ६ जून रोजी ५० हजारांवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात दीड हजारांनी घसरण झाली व चांदी ४८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली होती. ५ जून रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर आले होते.
सोमवारी चांदीच्या दरात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ती ४९ हजार रु पयांवर पोहोचली. मंगळवारी चांदी स्थिर राहिली. अशाच प्रकारे सोन्याच्या दरातही सोमवारी २०० व मंगळवारी आणखी १०० रु पयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. दोन दिवसात सोन्यात ३०० रुपये प्रतितोळा वाढ झाली.

खरेदीचे मुहूर्त टळले
गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांकडून खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. लॉकडाऊनदरम्यान गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरु पुष्यामृत अशा मुहूर्तावरील खरेदी होऊ शकली नव्हती. आता बाजार सुरू झाल्याने उत्साह दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सुवर्णबाजार बंद असल्याने खरेदी थांबली होती. आता चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आवक कमी असल्याने चांदीचे दर वाढत आहे.
- स्वरूप लुंकड,
सचिव, शहर सराफ
असोसिएशन, जळगाव

Web Title: Silver rises again by Rs 500 after falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.