सिंधी बांधव स्वखर्चाने उभारणार स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:59+5:302021-05-01T04:15:59+5:30
जळगाव : शहरात सध्या कोविडने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नातेवाइकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागादेखील मिळत नाही. रांगेत उभे ...
जळगाव : शहरात सध्या कोविडने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या नातेवाइकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागादेखील मिळत नाही. रांगेत उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीत अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य सिंधी पंचायतीतर्फे मेहरुण येथील स्मशानभूमी परिसरात शेड उभारून ओटे बांधून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर जयश्री महाजन आणि आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदनदेखील दिले आहे. यावेळी अशोक मंधाण, राम कटारिया, शंकर लखवानी, दयानंद विसरानी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, मेहरुण स्मशानभूमीत असलेल्या मोकळ्या जागेवर शेड उभारून तेथे ओटे बांधून अंत्यसंस्कारासाठी जास्त जागा उपलब्ध होईल, अशी भावना आहे. त्या जनहिताच्या कार्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील ट्रस्टने केली आहे.