सिंधी समाज परिचय मेळाव्यात देशभरातील समाजबांधवांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 06:48 PM2017-09-03T18:48:51+5:302017-09-03T18:52:55+5:30
उपक्रम: १४२ युवक-युवतींनी दिला परिचय
जळगाव: संत गोदडीवाला बाबा हरदासराम फाउंडेशन तथा बाबा हरदासराम मॅरेज ब्युरोतर्फे आयोजित १४ व्या अखिल भारतीय युवक-युवती परिचय मेळाव्यास देशभरातील सिंधीसमाजबांधव सहभागी झाले होते. १४२ युवक-युवतींनी परिचय दिला. रविवारी हा सोहळा संत बाबा हरदासराम समाज मंदिरात झाला. सिंधी समाजातील युवक-युवतींना विवाहासाठी योग्य जोडीदार निवडता यावा, या उद्देशाने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांच्या आग्रहावरून विधवा, विदूर व विकलांगांसाठी देखील हा मेळावा खुला ठेवण्यात आला होतो. भाषणबाजीला फाटा कुठल्याही समाजाचा मेळावा म्हटला की त्यात समाजातील मान्यवर, पुढारी यांची भाषणे आवर्जून असतात. मात्र त्यामुळे कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला राहून भाषणव स्वागतातच अधिक वेळ खर्च होतो. त्यामुळे सिंधी समाज संमेलनात आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत तसेच भाषण आदी बाबींना फाटा देत आदर्श निर्माण केला. केवळ बाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना आपला परिचय करून देता यावा. देशभरातून सहभाग या परिचय संमेलनात जळगाव, औरंगाबाद , अकोला , अमरावती ,बीड , मुंबई, ठाणे, यवतमाळ ,परभणी , अहमदनगर ,भोपाळ , वर्धा, जालना ,पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे, नागपूर, बºहाणपूर , विलासपूर, सिकंदराबाद, छिंदवाडा, जबलपूर, इटारसी , अलीगढ, ग्वालियर, कटनी आदी देशभरातील विविध शहरांमधून सुमारे १४२ विवाह योग्य युवक-युवती व त्यांच्या पालकांनी संमेलनात हजेरी लावली. त्यात ८६ मुले व ५६ मुलींचा समावेश होता. शहरातील मान्यवरांचाही सहभाग या परिचय मेळाव्यास शहरातील सिंधी समाजातील उद्योजक तसेच मान्यवरांचीही उपस्थिती होती. त्यात माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी,भगत बालाणी, हरीश जगवानी , गुलाब चुग्रा , ओमी सचदेव, पंकज दारा , शंकर तलरेजा, नरेश कावणा , राजकुमार वालेचा , रमेश कटारिया, प्रकाश आडवाणी, सुरेश हासवानी, रमेश मतानी, विजय दारा, प्रेम कटारिया, शंकर लखवाणी आदींचा समावेश होता. पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह जुळतात. त्यामुळे समाजबांधवांचा वेळ, पैसा वाचतो. त्यामुळे या संमेलनाला समाजबांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक अशोक रामानी यांनी केले. सूत्रसंचालन सीए रवी कटारिया, दिया कटारिया, भूमिका किसवाणी व संजय हिराणी यांनी केले .कार्यक्रमात अवयवदान व नेत्र दानावर आधारित लघु नाटिका सादर करण्यात आली. या मेळाव्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी रमेशलाल कटारिया, प्रकाश आडवाणी व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.