साहेब, या महिन्यात तरी वेळेवर पगार होतील का? (कुजबुज)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:21+5:302021-07-07T04:20:21+5:30
मात्र, गेल्या महिन्यात मे महिन्याचा पगार जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात झाला. मे महिन्यातील पगार विलंबाने होत असल्यामुळे अनेक कामगार ...
मात्र, गेल्या महिन्यात मे महिन्याचा पगार जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात झाला. मे महिन्यातील पगार विलंबाने होत असल्यामुळे अनेक कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन, तातडीने पगार होण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती, तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय वजन वापरून महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा कुठे मे महिन्याचा पगार जूनच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला.
मात्र, आता जूनचा पगार येत्या ७ जुलैला होणार असून, तो पगार वेळेवर होण्याबाबत काही कामगार संघटनांचे पदाधिकारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून, पगार वेळेवर होण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. तर काही कर्मचारी स्थानिक अधिकाऱ्यांना भेटून, पगाराबाबत विचारणा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी जळगाव आगारातील एक वाहक आगारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पगाराबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्या दालनात गेला होता. हे अधिकारी त्यांच्या दालनात काम करीत असताना, या कर्मचाऱ्याने त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन, साहेब, या महिन्यात तरी वेळेवर पगार होतील का? असा प्रश्न उपस्थित करून, पगाराची चौकशी केली. एरव्ही कधीही पगाराबाबत थेट अधिकाऱ्यांना न भेटणारा हा वाहक, आता पगारासाठी थेट अधिकाऱ्यांना भेटायला लागल्यावर, या प्रकाराची आगारातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
सचिन देव