सासरी आलेल्या मेहुण्याने केला शालकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:36+5:302021-07-17T04:13:36+5:30

मुक्ताईनगर : सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने २१ वर्षीय तरुण शालकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी ...

Sister-in-law murdered Schalke | सासरी आलेल्या मेहुण्याने केला शालकाचा खून

सासरी आलेल्या मेहुण्याने केला शालकाचा खून

Next

मुक्ताईनगर : सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने २१ वर्षीय तरुण शालकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. शहरातील भुसावळरोड पशुवैद्यकीय चिकित्सालयाशेजारील दुमजली इमारत असलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या घरात ही घटना घडली. या घटनेने परिसर हादरला आहे.

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विशाल वामन ठोसरे या तरुणासाठी गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे, ता. यावल) याने शालक विशाल हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय असून, घटनेनंतर संशयित मेहुणा फरार झाला आहे.

गुरुवारी जावयासाठी मांसाहारी पाहुणचार केल्यानंतर विशाल ठोसरे आणि मेहुणा विजय सावकारे हे वरच्या मजल्यावर झोपायला गेले. रात्री दोघे एकाच खोलीत झोपले खरे, मात्र सकाळी या खोलीतील चित्र ठोसरे कुटुंबासाठी आकाश कोसळल्या गत होते. डोक्यावर कुऱ्हाडीचा घावाने रक्त बंबाळ झालेले विशालचा मृतदेह कॉटवर पडलेला होते, तर मेहुणा येथून पसार झाल्याचे दिसून आले. या घटनेमुळे ठोसरे कुटुंब पुरते हादरले. अनाहूत घटनेने विशालच्या आईची मन:स्थिती पुरती भान हरपल्यासारखी होती. विशालला बोलवा म्हणून ती सारखी टाहो फोडत होती.

मार्चमध्ये झाले होते विशालचे लग्न

दरम्यान, मयत विशाल ठोसरे याचे नुकतेच ७ मार्च रोजी लग्न झाले होते. त्याची पत्नी निकिता ही ऑनलाइन परीक्षेसाठी माहेरी गेली आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या या संसाराचा मेहुण्यानेच घात केला. ही घटना नेमकी का घडली याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, ही घटना माहिती पडताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जळगाववरून आरोपीचा माग घेण्यास श्वान पाचारण करण्यात आले. पण फारसा उपयोग झाला नाही. पोलीस कर्मचारी संतोष नागरे, शैलेश चव्हाण, संदीप खंडारे, नितीन चौधरी, देवसिंग तायडे, कांतीलाल केदारे, दिली पाटील, राहुल बेहनवल तसेच श्वान जंजीरसोबत नीलेश झोपे व सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी तपास करीत होते.

Web Title: Sister-in-law murdered Schalke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.