काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 09:48 PM2020-03-12T21:48:56+5:302020-03-12T21:49:04+5:30

रस्ता झाला अरुंद : मैल कामगार नसल्याने उद्भवली स्थिती, वाहनचालकांचा जीव टांगणीला

Siteboards swallowed up by thorns | काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

काटेरी झुडपांनी केल्या साईटपट्ट्या गिळंकृत

Next

रावेर : बºहाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर रावेर ते बºहाणपूर दरम्यान काटेरी बाभळांच्या मोठमोठ्या झुडपांच्या फांद्यांनी साईडपट्टीसह मुळ रस्त्याही व्यापला आहे. यामुळे अरूंद झालेल्या या रस्त्यावर दुतर्फा वाहतूकीतील ओव्हरटेक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे लहान वाहनचालकांचा जीव टांगणीला आहे.
या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गत १० ते १५ वर्षांपासून भिजत घोंगडे पडून आहे. एकंदरित या राज्य महामार्गावरील वाढती रहदारी पाहता या रस्त्याचे रूंदीकरण होणे गरजेचे असताना दोन्ही बाजूच्या साईडपट्टीसह या रस्त्याचा दोन्ही बाजूंचा किनारा काटेरी झुडपांनी व्यापल्याने अरूंद झालेला हा राज्य महामार्ग वाढत्या अपघातातील मृत्यूचा सापळा बनला आहे.
या अरूंद झालेल्या राज्य महामार्गावर एका अवजड वाहनाला दुसºया अवजड वाहनाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जात असताना समोरून येणारी साधी दुचाकी वा पायी चालणाºयालाही काटेरी झुडपांच्या आक्रमणामुळे खाली साईडपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने उतरणे दुरापास्त ठरत असल्याने वाहनचालकांचा जीव काटेरी झुडूपांत तथा ओव्हरटेक करणाºया अवजड वाहनाखाली टांगणीला घातला आहे.
यासंबंधी लोकमत ने अनेकदा ठळक वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाले. त्याच अनुषंगाने आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या जटील प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी रस्त्यावरील मैल कामगार बंद करण्यात आल्याने व काटेरी झुडपांची छाटणी करण्यासाठी विशेष तरतूद नसल्यामुळे त्यांचे हात बांधले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, वाघोड येथील एका पांथस्थांचा मॉर्निंग वॉक दरम्यान तर दुसºयाचा एकापाठोपाठ झालेल्या मोटार वाहन अपघातात दोन बळी गेल्याचे औचित्य साधून रावेर पोलिस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला काटेरी झुडपांखालील साईडपट्टी मोकळी करण्याची ताकीद देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन ढिम्म असल्याने जनसामान्यांमधून कमालीचा तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
आमदार शिरीष चौधरी यांनी जनता दरबारात मांडलेल्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Siteboards swallowed up by thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.