तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांचे हाल

By admin | Published: March 8, 2017 12:25 AM2017-03-08T00:25:04+5:302017-03-08T00:25:04+5:30

जामनेर : नाफेडने ग्रेडर दिल्यास खरेदी करू, शेतकरी संघाची भूमिका, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

The situation of farmers on the purchase center of Ture | तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांचे हाल

तूर खरेदी केंद्रावर शेतकºयांचे हाल

Next

जामनेर  :येथील  बाजार समितीत सुरू असलेले शासकीय तूर खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. केंद्रावर सुमारे १५० ट्रॅक्टरसह शेतकरी ठाण मांडून आहेत. खरेदी का बंद केली, ती केव्हा सुरू होईल याची कोणतीही माहिती शेतकºयांना शेतकरी संघ अथवा बाजार समितीकडून मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नाफेड मार्फत खरेदी सुरू असल्याने त्यांचा ग्रेडर हजर असेल तरच खरेदी करू अशी भूमिका शेतकरी संघाने घेतली आहे. सोमवारी खरेदीची सुरुवात झाली. मात्र एकच ट्रॅक्टर मोजले गेले व नंतर खरेदी बंद करण्यात आल्याचे उपस्थित शेतकºयांचे म्हणणे आहे. बाजार समितीत असलेले हे एकमेव केंद्र असल्याने तालुक्यातील सर्वच गावातील शेतकरी तूर विक्रीसाठी येथे आणत आहे. नाफेडचे ग्रेडर जर खरेदीचे वेळी केंद्रावर येत नसतील तर शासनाने केंद्र बंद तरी करावे, जेणेकरून शेतकरी उपाशीपोटी या ठिकाणी थांबणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 शासकीय तूर खरेदी केंद्रावर ग्रेडर नसल्याने खरेदी बंद केली. सुरू होईल की नाही याची शाश्वती नाही. अधिकृत माहिती मिळत नाही. शेतकºयांचे हाल होत आहे. संतप्त शेतकरी कोणत्याही क्षणी रास्तारोको अथवा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तर आंदोलन करू
गुरुवारपासून खरेदी केंद्रावर तूर आणून ठेवली आहे. उघड्यावर तुरीचे पोते ठेवल्याने डुकरांचा त्रास होत आहे. घर सोडून पाच दिवस झाले कुणीच विचारपूर करायला तयार नाही. असेच सुरू राहिले तर आंदोलन करावे लागेल असा इशारा जोगलखेडे येथील शेतकरी  भास्कर पुंडलिक पाटील यांनी सांगितले.
शेतकºयांचा वाली नाही
दोन दिवसापासून खरेदी केंद्रावर मोजणीची वाट पाहत आहे. आमचे हाल सुरू आहेत, कुणीही शेतकºयांचा वाली नाही. असे लोहारा येथील अपंग शेतकरी अहमदखान भिकनखान यांनी सांगितले.                       (वार्ताहर)
बाजार समिती आवारात सुमारे १५० ट्रॅक्टर तूर भरलेले उभे आहेत. तर काही तुरीचे पोते उघड्यावर पडून आहेत. खरेदीला सुरुवात होईल या अपेक्षेने शेतकरी थांबून आहेत.
४भाड्याने घेतलेले ट्रॅक्टरचे दर दिवसाचे भाडे भरावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. काही शेतकºयांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळ नाही.
नाफेडचा ग्रेडर खरेदी केंद्रावर आल्यावरच त्याच्या उपस्थितीत तूर खरेदी करू असा निर्णय घेतला आहे. कारण हलक्या प्रतिची तूर खरेदी केल्यास ती नाफेडने स्वीकारली नाही तर जबाबदारी कुणाची? त्यामुळे ग्रेडरने उपस्थित राहावे यासाठी संपर्क करीत आहोत.               - चंद्रकांत बाविस्कर,
 चेअरमन, शेतकी संघ, जामनेर
तीन दिवसांपासून केंद्रावर तूर आणून ठेवली आहे.  खरेदी बंद पडल्याने ट्रॅक्टरचे दर दिवसाचे भाडे भरावे लागत आहे. हमीभावाने तूर खरेदी करण्याचा शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे वाईट वाटते.                    -रघुनाथ वाघ,
शेतकरी, शहापूर

Web Title: The situation of farmers on the purchase center of Ture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.