पारोळा तालुक्यातील हिवरखेडे खुर्द येथे सहा जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 04:46 PM2020-01-08T16:46:01+5:302020-01-08T16:46:58+5:30
हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या सात जनावरांनी काही तरी विषारी गवत पाला खाल्ल्याने या सातही जनावरांना विषबाधा झाली. यातील सहा जनावरे मृत्युमुखी पडली.
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या सात जनावरांनी काही तरी विषारी गवत पाला खाल्ल्याने या सातही जनावरांना विषबाधा झाली. यातील सहा जनावरे मृत्युमुखी पडली. यात या शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सूत्रांनुसार, हिवरखेडे खुर्द येथील शेतकरी रतिलाल सुकलाल पाटील यांच्या मालकीचे सात गुरे आहेत. त्यात दोन म्हशी, दोन बैल, तीन पारडू यांचा समावेश आहे.
गावालगत कपाशी पिकाच्या शेतात कापूस वेचून झाल्यानंतर ६ रोजी त्या शेतात ही जनावरे चरली. त्यांच्या खाण्यात काही तरी विषारी गवत वा पाला आल्याने या जनावरांना विषबाधा झाली. दुसºया दिवशी ७ रोजी ही सर्व जनावरे बेशुद्ध झाली. ती जागेवरून उठू शकली नाही. सर्वांनी माना टाकून दिल्या होत्या. अशा परिस्थितीत शेतकरी रतिलाल पाटील हे घाबरले. त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून या सर्व जनावरांना औषध उपचार केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. उपचारानंतर दुसºया दिवशी ८ रोजी यातीलन दोन बैल, दोन म्हशी व पार पारडू मृत्युमुखी पडले.
एकाच वेळी सहा जनावरे मृत्युमुखी पडल्याने या शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात दुभत्या म्हशी व बैल गेल्याने खूप मोठे नुकसान या शेतकºयाचे झाले. या वर्षी अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात पुन्हा विषबाधाने पशुधन गेले. या नुकसानीमुळे हे कुटुंब खूप खचले आहे. त्यांना शासकीय मदत यातून मिळावी, अशी अपेक्षा समस्थ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.