पदोन्नतीनंतर परीक्षा न देणारे जिल्ह्यातील सहा विस्ताराधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:13 AM2020-06-20T01:13:40+5:302020-06-20T01:14:42+5:30

सेवा पूर्वउत्तर परीक्षेत विहित मुदतीत पास न झाल्यामुळे जिल्ह्यातील सहा विस्ताराधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी यांचे पदावनत (डिमोशन) केले आहे.

Six extension officers and 34 village development officers in the district who did not appear for the examination after promotion 'failed' | पदोन्नतीनंतर परीक्षा न देणारे जिल्ह्यातील सहा विस्ताराधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी ‘नापास’

पदोन्नतीनंतर परीक्षा न देणारे जिल्ह्यातील सहा विस्ताराधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी ‘नापास’

Next
ठळक मुद्देविस्तार अधिकारी झाले ग्राम विकास अधिकारीग्राम विकास अधिकारी झाले ग्रामसेवक

उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : सेवा पूर्वउत्तर परीक्षेत विहित मुदतीत पास न झाल्यामुळे जिल्ह्यातील सहा विस्ताराधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी यांचे पदावनत (डिमोशन) केले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पदावनत झालेले दोन ग्राम विकास अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे. तर कुºहे पानाचे येथील ग्रामविकास अधिकारी यांच्यासह तीन ते चार ग्राम विकास अधिकारी अवघ्या चार महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे वीस ते पंचवीस वर्षात हा निर्णय का? घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच एवढे वर्ष या अधिकाऱ्यांनी सेवेचा लाभ घेतला, त्याबद्दल संबंधितांकडून काय वसुली करण्यात येणार आहे? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सेवेत लागल्यानंतर अवघ्या वर्षभरात शिकाऊ काळामध्ये सेवा परीक्षा विविध मुदतीत पास होणे गरजेचे असते. मात्र तब्बल सहा विस्तार अधिकारी व ३४ ग्राम विकास अधिकारी हे ही परीक्षा पास झाले नसतानाही ते पदावर कायम होते. विस्तार अधिकारी पंचायत समिती मध्ये बसून ग्रामपंचायती सह विविध विभागाचा विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत होते, तर ग्रामसेवक हे मोठ्या ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळत होते. गेली अनेक वर्षे हा कारभार सुरू होता. याकडे अधिकारी व प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष होते. मात्र गुरुवारी अचानक जे अधिकारी सेवा परीक्षा मुदतीत पास झाले नाही, त्यांचे डिमोशन करण्यात आल्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) बोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
हे विस्तार अधिकारी आता होतील ग्रामविकास अधिकारी
पदावनत लावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संतोष पवार पं. स. एरंडोल, चुनिलाल मोतीराया पं.स. जळगाव, देवचंद लोखंडे पं. स. जामनेर, भगवान माळी पं. स. धरणगाव, रामचंद्र संैदाणे पं.स. चाळीसगाव, बापू बागुल पं. स.चाळीसगाव या सहा विस्तार अधिकाºयांचा समावेश आहे. हे विस्तार अधिकारी सोमवारनंतर ग्रामविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
हे ग्रामविकास अधिकारी आता होतील ग्रामसेवक
सुभाष नारखेडे अंतुर्ली ता. मुक्ताईनगर , मोहन देवरे ग्रा.पं. तळई ता. एरंडोल , राजेंद्र पाटील ग्रा .पं. जाणवे ता . अमळनेर, सुभाष सूर्यवंशी ग्रा. पं. बहाळ ता. चाळीसगाव, सुनील महाजन ग्रा. पं. चहार्डी ता. चोपडा, हेमंत साळुंखे ग्रा. पं. भादली ता. जळगाव, मच्छिंद्र पाटील पंचायत समिती यावल , रमेश कोठोके ग्रा. पं. वडोदा ता.मुक्ताईनगर, दामू पाटील ग्रा. पं. तांबोळे, ता. चाळीसगाव, सतीश पाटील ग्रा. पं. भोरस ता. चाळीसगाव, रोहित पवार पं. स. जामनेर, श्रावण पाटील ग्रा.पं. बाळद, ता. पाचोरा, सुभाष पाटील ग्रा.पं. सामनेर ता. पाचोरा, मुरलीधर पाटील, ग्रा. पं. वाघोड ता. रावेर, विजय पाटील ग्रा. पं. अंजाळे, ता. यावल, पी. टी. झोपे ग्रा. पं. कुºहे पानाचे ता. भुसावळ, दिलीप शिरतूर ग्रा. पं. मेहुणबारे ता. चाळीसगाव, नवल पाटील ग्रा. पं. थोरगव्हाण, ता. रावेर, कांतीलाल बाविस्कर ग्रा. पं. दहिगाव ता. यावल, गिरधर पाटील ग्रा. पं. सार्वे ता. पारोळा, प्रदीप चव्हाण ग्रा. पं. कुºहाड ता.पाचोरा, राजेंद्र सोनवणे ग्रा. पं. कजगाव, ता. भडगाव, गणेश पाटील ग्रा. पं.निंभोरा, काशिनाथ सोनवणे ग्रा. पं. उंबरखेड ता. चाळीसगाव, धर्मा वाघ ग्रा. पं. पिलखोड ता. चाळीसगाव, अनिल पगारे ग्रा. पं. वाघळी ता. चाळीसगाव, कृष्णा वराडे ग्रा. पं. मनुर ता. बोदवड, रमेश पाटील ग्रा. पं. लोहटर ता. पाचोरा, राजेंद्र बैसाने ग्रा.पं. लोहारा ता. पाचोरा, पुरुषोत्तम खोब्रागडे पं. स. एरंडोल, सुभाष खिरडकर पं. स. मुक्ताईनगर , शामराव धनगर पं. स. रावेर, मधुकर मस्के पं.स. जामनेर, सुकलाल भिल पं. स. अमळनेर या ३४ ग्रामविकास अधिकाºयांचा समावेश आहे. यांना आता ग्रामसेवक म्हणून लहान ग्रामपंचायतीवर काम करावे लागणार आहे.

Web Title: Six extension officers and 34 village development officers in the district who did not appear for the examination after promotion 'failed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.