हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:17 PM2020-06-16T22:17:10+5:302020-06-16T22:17:16+5:30
मुबलक पाणी मिळणार
भुसावळ : यंदा पावसाळ्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हतनुर धरणाचे ४१ पैकी ६ दरवाजे १६ रोजी अर्धा मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला. सद्यस्थितीला धरणात १८३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून यापैकी १३३ दलघमी मृतसाठा तर ५० दलघमी जिवंत साठा आहे. शहरांमध्ये तापी बंधाºयाने तळ गाठल्यामुळे भुसावळकरांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. मात्र मुबलक पाणी मिळणार आहे. वरणगाव, आयुध निमार्णी, रेल्वे, भुसावळ शहर , दीपनगर औष्णिक केंद्र तसेच जळगाव व मलकापूर एमआयडीसीसह जिल्ह्यातील १३० गावे व शहरांना धरणातून पाणीपुरवठा होतो. चोपडा, यावल, रावेर या तालुक्यातील सुमारे ३७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली खाली येते.