विषारी चारा खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 20:02 IST2021-06-07T20:01:57+5:302021-06-07T20:02:51+5:30
टाकळी प्र.चा येथे विषारी चारा खाल्याने चाळीस हजार रुपये किंमतीच्या सहा बकऱ्यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला.

विषारी चारा खाल्याने सहा बकऱ्यांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे विषारी चारा खाल्याने चाळीस हजार रुपये किंमतीच्या सहा बकऱ्यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पशुधन मालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
यात बकरीमालक मोतीलाल रामा अहिर यांच्या २८ हजार रुपये किंमतीच्या चार बकऱ्या, सिंधू नामदेव सोनवणे यांची सात हजार किंमतीची एक बकरी तर रामसिंग त्र्यंबक सोनवणे यांचा पाच रुपये किंमतीचा एक बोकड याचा समावेश आहे. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी या घटनेची दखल घेवून पशुवैद्यकीय अधिकारी राठोड यांना सायंकाळी घटनास्थळी पाठविले आहे. दरम्यान, या बकऱ्यांना कुणी तरी विषारी चारा खाऊ घातला असण्याची चर्चा या परिसरात आहे.