विनापरवानगी शहरात आलेल्यास सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:43 PM2020-06-24T12:43:01+5:302020-06-24T12:43:34+5:30
जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला किरण शंकर खर्चे (रा.सुप्रीम कॉलनी) हा विनापरवानगी शहरात येऊन दहशत माजवत असल्याने पोलिसांनी ...
जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला किरण शंकर खर्चे (रा.सुप्रीम कॉलनी) हा विनापरवानगी शहरात येऊन दहशत माजवत असल्याने पोलिसांनी त्याला अटक केले होते. या प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने गुुन्हेगारास सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
किरण खर्चे याला २०१७ मध्ये प्रांताधिकाऱ्यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र तो २०१८ मध्ये शहरात दाखल झाला़ या खटल्यात सरकारपक्षाने पोलीस कर्मचारी आनंदसिंग पाटील, सतीष गर्जे यांच्या साक्ष घेतल्या. सुनावणीअंती मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीनाथ फड यांनी खर्चे याला शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड.निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले.