बेकायदेशीररित्या दारूची विक्री सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:09+5:302021-05-08T04:16:09+5:30

जळगाव : सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या सहा जणांवर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये ...

Six people have been charged with selling alcohol illegally | बेकायदेशीररित्या दारूची विक्री सहा जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीररित्या दारूची विक्री सहा जणांवर गुन्हा दाखल

Next

जळगाव : सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या सहा जणांवर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये ९१ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनी जवळील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणे आणि त्याची विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दारू अड्ड्यावर छापा टाकला. त्यात अवैधरित्या दारू तयार करणे आणि विक्री करणाऱ्या लक्ष्मी चंदन मलके (रा. रामेश्वर कॉलनी), माधवी प्रतिक गारूगे (रा. तांबापुरा), गौरी संजय नेतलेकर (रा. जाखनीनगर, कंजरवाडा), नितीने विजू नेतलेकर (रा. जाखनी नगर, कंजरवाडा), लक्ष्मी संजय अभंगे (रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा) आणि कैलास रविंद्र बडे (रा. जगवाणीनगर) या सहा जणांवर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील ९१ हजार ७२० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोउनि रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, सुनील सोनार, मिलींद सोनवणे, चेतन सोनवणे, इम्रान सैय्यद, असीम तडवी, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, साई मुंढे, इम्रान बेग, होमगार्ड करण वंजारी शिवदास कळसकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: Six people have been charged with selling alcohol illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.