२२, ३८ वर्षीय तरुणांसह सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:19 AM2021-03-09T04:19:20+5:302021-03-09T04:19:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संसर्गासह मृतांची संख्याही वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. सोमवारी जळगाव तालुक्यातील एका २२ ...

Six people, including 22- and 38-year-olds, died | २२, ३८ वर्षीय तरुणांसह सहा जणांचा मृत्यू

२२, ३८ वर्षीय तरुणांसह सहा जणांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संसर्गासह मृतांची संख्याही वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. सोमवारी जळगाव तालुक्यातील एका २२ वर्षीय व जळगाव शहरातील एका ३८ वर्षीय तरूणांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चार महिन्यातील ही एका दिवसातील मोठी संख्या आहे. गंभीर बाब म्हणजे यात शहरातील तीन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५९५ नवे बाधित आढळून आले आहेत.

सोमवारी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील ३८, ६३, ६५ वर्षीय पुरूषांचा तर जळगाव तालुक्यातील २२ वर्षीय तरूण, रावेर तालुक्यातील ८२ तर जामनेर तालुक्यातील ७४ वर्षीय पुरूषांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांची संख्या १४१० वर पोहोचली आहे.

पुन्हा पाचशे पार

जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्येने ५०० चा आकडा ओलांडला आहे. सोमवारी जिल्ह्यात ५९५ नवे बाधित आढळून आले आहेत. यात शहरातील २७५ रुग्णांचा समावेश आहे. यासह चाळीसगावात ८१, भुसावळ तालुक्यात ५९, चोपडा तालुक्यात ४८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णसंख्या ६५ हजार १३८ वर पोहोचली आहे. तर सोमवारी ३०१ बाधितांना घरी सोडण्यात आले आहे. बरे होणाऱ्यांची संख्या ५८८३६ वर पोहोचली आहे.

६७२१ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीचे ६७२१ अहवाल प्रलंबितच असून आरटीपीसीआर तपासण्या घटवून आता ॲन्टिजेन चाचण्या वाढविण्यात आलेल्या आहेत. सोमवारी ५७५ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यासह १०१३ आरटीपीसीआरचे अहवाल प्राप्त झाले. तर १९१९ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. प्रलंबित अहवालांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयात येण्यास विलंब

३८ वर्षीय तरुण हा गेल्या बारा दिवसांपासून घरीच उपचार घेत होता. रविवारी अत्यंत गंभीरावस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची लागण अधिक झाल्यामुळे अखेर या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Web Title: Six people, including 22- and 38-year-olds, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.