भुसावळात सहा जणांना डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:56 AM2018-09-12T00:56:46+5:302018-09-12T00:57:28+5:30
सिंधी कॉलनीवासीयांतर्फे पालिकेत धाव
भुसावळ, जि.जळगाव : शहरात सहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, गेल्या महिनाभरात बारापेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. एका खासगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. येथील एका खासगी रुग्णालयात तीन तर शहरातील सिंधी कॉलनीतील अन्य तीन रुग्ण डेंग्यूची लागण झाल्याने शहरात तीन खासगी वेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहे.
शहरातील गंगाराम प्लॉट, महेशनगर व अन्सारुल्ला मशीद परिसरातील असे तीन तर सिंधी कॉलनीतील तीन रुग्णांवर डेंग्यूची लागण झाल्यामुळे उपचार सुरू आहे. दिवसागणिक डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढच होत असून, शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, डेंग्यूसारख्या गंभीर आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणीसाठवण करू नये. स्वच्छता राखावी, एक दिवस कोरडा दिवस म्हणून पडावा. अंगभर कपडे घालावे, असे आवाहन डॉ.राहुल जावळे यांनी केले.
तसेच याची लक्षणे दिसतात लागलीच तपासणी करून आणयाचा सल्लाही दिला.
प्रभाग २१ मधल्या सिंधी समाज बांधवांनी प्रभागात साफसफाई होत नाही. यामुळेच प्रभागातील तीन जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.