औरंगाबादमधून कापूस व्यापा-याचे सहा लाख लांबविणा-या चोरट्याला जळगावातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 08:24 PM2017-11-12T20:24:12+5:302017-11-12T20:26:23+5:30
जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघड झाले असून रविवारी औरंगाबाद पोलिसांनी जळगावात येऊन हाड्याला ताब्यात घेतले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघड झाले असून रविवारी औरंगाबाद पोलिसांनी जळगावात येऊन हाड्याला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पंढरीनाथ भवार (वय ३४, रा.लांझी वाळूज, ता.गंगापूर जि.औरंगाबाद) यांनी शेतकºयांकडून विकत घेतलेला १४० क्विंटल कापूस गुजरातमध्ये विक्री केला होता. त्याचे ६ लाख १६ हजार १०० रुपये औरंगाबाद येथील भावेशकुमार कल्लुभाई पटेल यांच्याकडे जमा केली होती. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ही रक्कम भवार यांनी लाल रंगाच्या बॅगेत टाकून दुचाकीच्या(क्र. एम.एच.२० बी.पी.४१३७) डिक्कीत ठेवली. त्यानंतर वाळूजमधील ओयासिस चौकातील गणेश टायर्स येथे ट्रॅक्टरचे दुरुस्तीचे काम करीत असलेल्या वडीलांकडे सायंकाळी पावणे पाच वाजता भवार पोहचले. तेथे दुकानदाराशी चर्चा करीत असतानाच महागड्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी दुचाकीची डिक्की फोडून त्यातील रोकड लांबविली. दुकानातील कर्मचाºयाने हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला,मात्र उपयोग झाला नाही.याप्रकरणी वाळूज, एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
औरंगाबाद पोलीस धडकले जळगावात
गुन्हा दाखल झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी गुन्ह्याची पध्दत लक्षात घेता जळगाव, नाशिक, जालना येथील पोलिसांकडून माहिती घेतली. जळगावात अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. हाड्याचे फोटो तसेच फिर्यादीने दिलेले वर्णन तसेच तांत्रिक पुरावे हे सर्व एकत्र आल्याने उपनिरीक्षक विजय जाधव यांचे पथक रविवारी जळगावात धडकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने हाड्याला दुपारी ताब्यात घेण्यात आले. कुराडे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पथक त्याला घेऊन औरंगाबादला गेले.