सहा हजार कुटुंबांना मिळणार खावटी योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:22+5:302021-07-17T04:14:22+5:30

तालुक्यातील सहा हजार अनुसूचित जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार रुपये थेट ...

Six thousand families will get the benefit of Khawati scheme | सहा हजार कुटुंबांना मिळणार खावटी योजनेचा लाभ

सहा हजार कुटुंबांना मिळणार खावटी योजनेचा लाभ

Next

तालुक्यातील सहा हजार अनुसूचित जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार रुपये थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असून, दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.

वाटप करण्यात येत असलेल्या खावटी किटमध्ये मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती अशा स्वरूपाच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे.

आदिवासी कुटुंबाना देण्यात येणाऱ्या वस्तू चांगल्या दर्जाच्या आहेत की नाही, याबाबत तसेच वाटपात गैरप्रकार न होता पात्र लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. तसेच आगामी काळात आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी यंत्रणा व मदत उभी करेन, असे आश्वासनदेखील आमदारांनी दिले.

याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, भाजप तालुका संघटन सरचिटणीस तथा खडकी बुद्रुक उपसरपंच धनंजय मांडोळे, सरपंच सचिन पवार, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, माजी नगरसेवक प्रा. संजय घोडेस्वार, शेषराव पाटील, गजेंद्र विसपुते, रणजित पाटील, मुख्याध्यापक अमोल घोडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बछे, प्रा. वर्षा निकम, मुख्याध्यापक गवारे, सरदार, रावते, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी शाळेचे शिक्षक, कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी वीर योद्धे भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी खावटी योजनांसंदर्भात सविस्तर माहिती विशद करून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना याबाबत माहिती दिली.

Web Title: Six thousand families will get the benefit of Khawati scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.