रेल्वे ब्लॉकमुळे सहा गाड्यांना एक ते दोन तास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 08:34 PM2019-04-10T20:34:35+5:302019-04-10T20:35:39+5:30
भुसावळ विभागात नॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्य तसेच इतर तांत्रिक कामासाठी ६ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेण्यात येणार आहे.
भुसावळ : विभागात नॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्य तसेच इतर तांत्रिक कामासाठी ६ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेण्यात येणार आहे. १० रोजी सकाळी ९:५० ते १२:५० यादरम्यान खांबा क्रमांक ४४३ जवळ कार्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे अप मार्गावरील सहा गाड्यांना सुमारे एक ते दोन तास विलंब झाला. यात गाडी क्रमांक १२५३३ लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ५० मिनिट,१२६२८ नई दिल्ली-बेंगलोर कर्नाटका एक्सप्रेस ५० मिनट, १५०१८ गोरखपूर-एलटीटी काशी एक्सप्रेस दोन तास, १७०१९ जयपूर-हैदराबाद ५५ मिनट, १७०३७ सिकंदराबाद-बिकानेर ४५ मिनिट, १२१६६ बनारस-रत्नागिरी १५ मिनिटे उशिराने धावल्या.
१९ एप्रिलपर्यंत रेल्वे ब्लॉकमुळे गाड्यांची अशी स्थिती राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.