कापसाच्या ट्रकने चिरडल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:14 PM2019-12-18T22:14:45+5:302019-12-18T22:14:50+5:30
पाचोरा येथील अपघात : रस्ता ओलांडताना आईबाबांच्या डोळ््यांसमोरच अंत
वरखेडी, ता.पाचोरा : शेंदुर्णी येथून कापूस भरून गुजरात कडे जाणा?्या ट्रकने येथील सहावर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली. प्रतीक्षा गोकुळ भिल्ल (वय ६) असे या बालिकेचे नाव आहे.
लोहारी ग्रुप ग्राम पंचायतीशी संलग्न असलेल्या पाचोरा रोडला लागूनच वसलेल्या इंदिरा आवास या ५० ते ५५ घरांच्या छोट्याशा वस्तीतील सालदारकी करणारे दांपत्य गोकुळ महादू भिल्ल हे पत्नी लक्ष्माबाई व त्यांची मुले राहुल, खुशी, प्रतिक्षा व अरुण यांच्यासह बुधवारी सायंकाळी सप्तश्रृंगी गडावरून देवीचे दर्शन आटोपून आपल्या चौघा मुलांसह आपल्या गावी रिक्षाने आले. इंदिरा आवास वस्तीजवळ येथील प्रवाशांना उतरवण्यासाठी रिक्षा थांबली असता ही चारही मुले गाव आल्याच्या आनंदातच रिक्षातून उतरले. अवघ्या काही फुट अंतरावर नजरेसमोर आपली झोपडी दिसताच चौघे भाऊबहीण झोपडीच्या दिशेने रिक्षातून उतरून पळत सुटले. परंतु, रस्ता ओलांडत असताना विरूध्द दिशेने येणा?्या ट्रकने (जीजे-०२-एक्स-३२५७) प्रतिक्षा हिला जोरदार धडक दिल्याने आई-वडिलांच्या डोळ््यांसमोर ही बालिका जागीच ठार झाली. यावेळी आईबाबांनी एकच हंबरडा फोडला. आई-वडलांनी इतर तिघांना क्षणात मागे ओढले म्हणून इतर ती मुले बालंबाल बचावली.
पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे हे घटनास्थळी आपल्या कर्मचा?्यांसह तत्काळ पाहचले. यावेळी नातेवाईकांनी आधी पंचनामा करा व मगच मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी हलवा, असा आग्रह धरला होता. परंतु गावातील काही व्यक्तींनी मध्यस्थी करीत मृत बालिकेच्या आई-वडीलांसह नातेवाईकांना समजवले. त्यानंतर पाचोरा ग्रामीण रूग्णालयात बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.
सदरचा ट्रक पिंपळगाव (हरे.) पोलिसांनी ताब्यात घेऊन जमा केला असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रतीक्षा ही अंगणवाडीत शिकत होती. तिच्यापेक्षा भाऊ राहुल, बहीण खुशी थोरले असून तिच्या पाठीवर अरूण हा लहान भाऊ आहे. तिच्या अशा अपघाती निधनाने इंदिरा आवास वस्तीवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वरखेडी-पाचोरा रस्यावर पंधरा दिवसात ही तिसरा अपघात आहे.