गौण खनिज अपहरात सोळावे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:17+5:302021-01-09T04:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गौण खनिज अपहार प्रकरणात कागदपत्रांची मागणी करणारे १५ पत्र देऊनही माहिती मिळत नसल्याने तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गौण खनिज अपहार प्रकरणात कागदपत्रांची मागणी करणारे १५ पत्र देऊनही माहिती मिळत नसल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई होत नसल्याने जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी जि. प. सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांना १६वे पत्र दिले असून सदस्यांच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून आपण प्रशासनाकडे माहिती मागत असून, वारंवार सभांमध्येही विषय उपस्थित केला आहे. एका जिल्हा परिषद सदस्याला माहीत मिळत नसेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सावकारे यांनी पत्रात म्हटले आहे. शिवाय लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एल. पाटील यांच्याकडे पदभार राहिल्यास निपक्षपातीपणे चौकशी होणार नाही, म्हणून त्यांच्याकडील पदभार काढावा, अशीही मागणी सावकारे यांनी केली होती. मात्र, त्यावर शिवाय जिल्हाधिकारी यांनी दिलेले वसुलीच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नसल्याने ही सदस्यांच्या हक्क आणि अधिकारांची प प्रशासनाकडून पायमल्ली होत असल्याचे सावकारे यांनी म्हटले आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी या सोळाव्या पत्राद्वारे केली आहे.