नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी, वरखेडे येथे झोपेत असलेल्या महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:34 AM2017-11-28T07:34:50+5:302017-11-28T07:35:09+5:30
चाळीसगाव - नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.
वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या ७०वर्षीय महिलेवर झोपेत असताना बिबट्या हल्ला करीत ठार केले. मंगवारी रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. झोपडीत सावत्र मुलगा, सुन नातवंडे ही झोपले होते. यमुनाबाई पहिल्या क्रमांकाने झोपली होती यामुळे तिला लक्ष करीत तिच्या वर हल्ला केला व त्याने तिला ओढत नेले. घरातील इतर लोकांना जाग येत नाही तोवर महिलेचे डोके धड्डापासुन वेगळे झाले होते.