सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:40 PM2017-09-12T17:40:43+5:302017-09-12T17:40:43+5:30

24 रोजी उद्घाटन : महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र

Sixth Dr. Babasaheb Ambedkar Sammelan Jalgaon | सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

Next
ठळक मुद्दे दिग्गज विचारवंत सहभागी होणार संमेलनाचे विचारसूत्र महिलाच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या पाश्र्वभूमीवर सहावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगाव येथे 24 सप्टेंबर रोजी  सकाळी 9 ते संध्याकाळी सहा या वेळेत कांताई सभागृहात होणार आहे.  यावेळी दिग्गज विचारवंत सहभागी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजीद शेख यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली. 
यावेळी संमेलनाचे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, वासंती दिघे,  वैशाली पाटील, अशफाक पिंजारी, फईम पटेल, डॉ. शरीफ शेख, सुधाकर पाटील, प्रा. दिंगबर कटय़ारे उपस्थित होते.
प्रगतीशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती आणि पुरोगामी समविचारी संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  सर्वसामान्य नागरिकांपयर्ंत पोहचावे या हेतूने एकूण 10 संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतार्पयत नागपूर, नाशिक, पुणे, भोर, नांदेड येथे हे संमेलन झाले. आता जळगावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि पुरोगामी समविचारी संघटनेच्यावतीने 24 रोजी सहावे संमेलन होणार आहे.  उद्घाटन प्रा. डॉ. अंजली मायादेव आंबेडकर यांच्याहस्ते होणार आहे.  त्यानंतर त्यांचे बीज भाषण होईल.
यावेळी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर प्रथम सत्रात ‘हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ याविषयावर प्रा. श्रुती तांबे तर दुस:या सत्रात ‘अल्पसंख्यांक स्त्रीया आणि संविधान’ या विषयावर विचारवंत डॉ. रजिया पटेल, तिस:या सत्रात ‘स्त्री शिक्षणाची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर डॉ. भारती पाटील, ‘जागतिकीकरणाचे स्त्रीयांवरील परिणाम’ या विषयावर प्रा. विनया मालती हरि तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. पुष्पा भावे, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे  पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

संमेलनाचे विचारसूत्र महिलाच
 या संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे, महिलांच्या मानवी जीवन जगण्याच्या हक्कासाठी उपयोगी ठरणारा दिशादर्शक दृष्टीकोन ठेवून, महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र महिलाच आहे. 

Web Title: Sixth Dr. Babasaheb Ambedkar Sammelan Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.