‘पैशाच्या’ मुद्यावर संशयकल्लोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:53 AM2019-08-02T11:53:21+5:302019-08-02T11:54:04+5:30

तथ्य असल्यास संबधितावर कारवाई

 Skeptics shout at 'money' issue! | ‘पैशाच्या’ मुद्यावर संशयकल्लोळ !

‘पैशाच्या’ मुद्यावर संशयकल्लोळ !

Next

जळगाव : शहरातील एका प्रभागातील नगरसेवकाला खड्डे दुरुस्तीची मागणी करणाऱ्या, नागरिकांना मत देताना तुम्ही पैसे घेतले असल्याने तुम्ही बोलू नका..’ असे खडसावले होते. ‘लोकमत’ ने याबाबतचे वृत्त गुरुवारी प्रकाशित केल्यानंतर भाजपा नगरसेवकांमध्ये एकच संशयकल्लोळ निर्माण झालेला दिसून आला. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेवकावर केलेला आरोप फेटाळला असून, काह तथ्य आढळ्ल्यास याबाबत कारवाईचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर शहरात सर्वच सोशल साईटसवर याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली. सत्ताधारी नगरसेवक असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी गुरुवारी सायंकाळी महापौरांच्या दालनात नगरसेवकांना बोलावून घेतले. यावेळी याबाबत नगरसेवकांकडून माहिती जाणून घेतल्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपाचे गटनेते भगत बालानी यांनी याबाबत संबधित नगरसेवकाबाबतची माहिती घेवून तथ्य आढळल्यास कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, प्राथमिक चौकशीत भाजपाच्या कोणत्याही नगरसेवकाने अशाप्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्योती चव्हाण यांनी या वृत्तामुळे आपल्याकडे देखील संशयाने पाहिले जात असल्याचे सांगितले. जर कोणत्याही नगरसेवकाने अशाप्रकारचे उत्तर नागरिकांना दिले असेल तर ते चुकीचेच आहे. याबाबत चौकशी करु असेही आमदार यावेळी म्हणाले.

Web Title:  Skeptics shout at 'money' issue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.