सीए अंतिम परीक्षेत आकाश कामळस्कर चमकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:10 PM2021-02-02T20:10:20+5:302021-02-02T20:10:26+5:30

जळगाव : चार्टर्ड अकाँटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाँउटंट ऑफ इंडियातर्फे ऑनलाईन जाहीर ...

The sky shone brightly in the CA final exam | सीए अंतिम परीक्षेत आकाश कामळस्कर चमकला

सीए अंतिम परीक्षेत आकाश कामळस्कर चमकला

Next

जळगाव : चार्टर्ड अकाँटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाँउटंट ऑफ इंडियातर्फे ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जळगावातील आकाश अजय कामळस्कर याने ८०० पैकी ४७६ गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम आला आहे.

कोरोनाचे नियम पालन करून नोव्हेंबर २०२० मध्ये सीएची अंतिम परीक्षा परीक्षा घेण्यात आली. देशभरातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़ या परीक्षेचा सोमवारी आयसीएआयने निकाल जाहीर झाला. यामध्ये शहरातील आकाश कामळस्कर व अंजुमन रमजान तडवी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आकाश याने पहिल्या प्रयत्नातच परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सीपीटी परीक्षेतही तो अव्वल ठरला होता. सीए परीक्षा उत्तीर्ण करणारा आकाश हा काथार वाणी समाजातील एकमेव विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे वडील अजय कामळस्कर, वर्षा कामळस्कर यांनी कौतूक केले. तसेच अंजुमन हा यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील रहिवासी असून तो कवी रमजान तडवी यांचा पूत्र आहे. प्रतिकुल परिस्थितीत हे यश संपादित केल्यामुळे त्याचेही सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 

Web Title: The sky shone brightly in the CA final exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.