निंदकाचे घर असावे शेजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:57+5:302021-07-05T04:12:57+5:30

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, ...

The slanderer's house should be next door ... | निंदकाचे घर असावे शेजारी...

निंदकाचे घर असावे शेजारी...

Next

आपण आपल्या मित्रमंडळीत, समाजात, घरात, कुटुंबात, परिवारात, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी भरपूर लोकांमध्ये वावरत असतो. अशा वेळेस कुणाचा विचार, स्वभाव, सवयी, बोलणे आपल्यास न पटणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा उदोउदो करणे कितपत योग्य आहे? काही व्यक्तींचा स्वभाव तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा असा बनलाच आहे. त्यात सुधारणा करणे कठीण नाही, पण शक्य आहे. नेहमी एखादी गोष्ट केल्यास तो स्वभावाचा भाग बनून जातो. निंदा करणे हा स्वभावाचा भाग बनलेल्या लोकांचे पण असेच आहे. अगदी बारीक-सारीक बाबींवरही ते सहकाऱ्याची, कुटुंबातील सदस्यांची निंदा करतात, त्याचे त्यांना काहीच वाटत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव बनला आहे.

या निंदा करणाऱ्यांच्या हो मध्ये, आपण हो दिला तर नकळत आपलाही स्वभाव त्यांच्या सारखा बनतो, याची जाणीवही आपणास नसते. तेव्हा कुणी निंदा करीत असला तर एक चांगले वाक्य आहे, ते म्हणजे `सुनते हुए न सुनो, देखते हुए न देखो`. सूक्ष्म विचार केला तर त्यातून एकच भाव निघतो, तो म्हणजे जर कुणी आपल्यासमोर दुसऱ्या व्यक्तीची निंदा केली तर स्पष्टपणे त्यांना थांबवा.

काही वेळेस आपले वरिष्ठ अथवा मोठे निंदा करतात, तेव्हा त्यांना थांबविण्याचे धारिष्ट्य आपणात नसेल, किंवा त्यांना निंदा करण्यापासून प्रवृत्त करता येत नसेल तर फक्त एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. असे केल्यास त्यांना त्याची जाणीव होईल. मात्र, त्यांच्या हो मध्ये हो देऊ नका. तुम्ही प्रतिसाद देत नाही, असे त्यांना जाणवेलच आणि असे केल्यास पुढे भविष्यात दुसऱ्यांची निंदा तुमच्याकडे ते पुन्हा कुणाची निंदा करणार नाही. त्याचा हा स्वभाव बदलण्यास तुम्ही पुढाकार घ्यावा, यामुळे एक होईल आपण इतरांचे दुर्गुण आपल्यात येऊ देणार नाही. आपण निंदा, नालस्ती ऐकून आपले मन अक्षरश: कचराकुंडी बनवितो, तेव्हा आपले मन कचराकुंडी बनवू नका. कुणीही यावे आणि तुमच्या कानात इतरांच्या निंदारूपी कचरा टाकावा. मनाला मंदिर बनवायचे असेल तर कुणी दुसऱ्याची निंदा,नालस्ती तुमच्याकडे करू लागला तर त्यास तेथेच थांबवा आणि त्यास त्याची जाणीव करून द्या, असे केल्यास निंदकाची घरे हळूहळू कमी होतील आणि हा समाज मूल्यनिष्ठ बनेल.

- ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, उपक्षेत्र संचालिका, ब्रह्माकुमारीज, जळगाव

Web Title: The slanderer's house should be next door ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.