जळगावात पाच वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 11:20 PM2017-08-02T23:20:42+5:302017-08-02T23:25:00+5:30
मनपाने वृक्ष अधिका:यांना भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - मेहरूण मधील महादेव मंदिराच्या मागील भागात असलेल्या एका शेताच्या बांधानजीक असलेली पाच झाडे बुधवारी तोडण्यात आली. याप्रश्नी मनपाने वृक्ष अधिका:यांना भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मेहरूण मधील महादेव मंदिराच्या मागील भागाकडून शिवाजी उद्यान स्मशानभूमीकडे जाणा:या रस्त्यावरील शेताच्या बांधाच्या बाजूने असलेली पाच झाडे पूर्ण, 2 लहान झाडे व तीन झाडांच्या फांद्या शेत मालकाने तोडल्याचा प्रकार लक्षात आला. बुधवारी दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत तातडीने प्रभाग समिती 3 चे अधिकारी सुशील साळुंखे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. साळुंखे यांनी तातडीने या भागातील बांधकाम उपअभियंत्यास या ठिकाणी पाठविले होते.
या ठिकाणी सुबाभुळची पाच झाडे पूर्ण, दोन लहान झाडे व तीन झाडांच्या फांद्या तोडल्याचे लक्षात आले. याप्रश्नी संबंधीत अभियंता प्रभाग अधिकारी साळुंखे यांना अहवाल सादर करणार आहे.