गटारीच्या कामासाठी डेरेदार वृक्षांची कत्तल
By admin | Published: May 19, 2017 03:33 PM2017-05-19T15:33:39+5:302017-05-19T15:33:39+5:30
पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
ऑनलाइन लोकमत
तळोदा, नंदुरबार, दि. 19 - तळोदा येथील वळण रस्त्यावर असलेल्या डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आली असल्याने पर्यावरण प्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े आधीच पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना आता रस्ते व गटारीच्या कामांसाठी अशा प्रकारे वृक्षतोड करण्यात येत आह़े
शहरालगत असलेल्या वळण रस्त्यालगत नागरी वस्ती आह़े चिनोदा चौफुलीकडे जाणा:या रस्त्यावर पालिकेतर्फे मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व गटारींचे काम गेल्या 10 महिन्यांपासून सुरु आह़े अनेक महिने लांबणीवर पडलेले हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही़ या परिसरात गटारींसाठी रस्ता खोदून ठेवल्याने अनेक वेळा यामुळे कॉलनीतील नागरिकांना या मार्गाने जाणे येणेदेखील अत्यंत कठिण होत आह़े गटारींच्या कामासाठी परिसरातील सुमारे चार डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली आह़े एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात उपक्रम राबविण्यात येत असताना दुसरीकडे या ना त्या कारणाने वृक्षांची तोड करण्यात येत असल्याने नागरिक तसेच पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या दिवसांमध्ये उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी डेरेदार वृक्षांचाच मोठय़ा प्रमाणात आसरा असतो़
या वृक्षतोडीबाबत पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्याशी संपर्क साधला असता़ ‘मी 12 मेपासून बाहेरगावी आह़े याबाबत माहिती नाही’ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पालिकेकडूनही याबाबत अधिक माहिती मिळाली नाही़ दरम्यान वृक्षतोडीचे अनेक प्रकार तळोदा येथे होत असल्याने अशा प्रकारे वृक्षांची कत्तल करणा:यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आह़े