उनारे... उनारे... म्हणत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:12 PM2020-01-04T15:12:00+5:302020-01-04T15:13:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूच्या घोड्यांना चहू बाजूने पाण्यातसुद्धा संताजी धनाजी दिसायचे आणि त्यांची तारांबळ उडायची. तसेच सध्या अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ होत आहे.

The slopes of those who sat on the floor saying "unres ... unres ..." | उनारे... उनारे... म्हणत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची पळापळ

उनारे... उनारे... म्हणत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची पळापळ

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानमहिन्यात साडेचार हजार शौचालय बांधले १२६३ नवीन नोंदणी

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूच्या घोड्यांना चहू बाजूने पाण्यातसुद्धा संताजी धनाजी दिसायचे आणि त्यांची तारांबळ उडायची. तसेच सध्या अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ होत आहे. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांची गाडी दिसताच आहे त्या स्थितीत शौचासचा डबा घेऊन, पॅन्ट, धोतर आवरत पळापळ होताना दिसत आहे. त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेत. गेल्या एका महिन्यात साडेचार हजार शौचालय बांधले गेले असून, १२६३ नोंदणी झाले आहेत.
स्वच्छ भारत अभियानंतर्गत ग्रामीण भागात एलओबी अंतर्गत ५०७० शौचालय तर बेस्लाईनचे २० हजार ६५१ बांधण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालयासाठी शासनाने अनुदान दिले होते. मात्र ग्रामस्थांची अनुत्सुकता तसेच कर्मचाºयांंची जनजागृती करण्यास टाळाटाळ यामुळे अनेक लोक यापासून वंचित झाले होते, तर काहींनी पारंपरिक सवयींमुळे बाहेर जाणे योग्य समजल्याने अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही तर अनुदान घेणेही टाळले. मात्र १०० टक्के तालुका हगणदारी मुक्त करण्यासाठी गटविकास अधिकाºयांनी चंग बांधला आहे.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पथकाला घेऊन गावोगावी जाऊन अचानक छापे टाकून उघड्यावर शौचास बसणाºया ग्रामस्थांना पळवत आहेत. गटविकास अधिकाºयांचे पथक येताच कुणी डब्बा घेऊन पळतो तर कुणी पॅन्ट आवरत पळतो, असा गमतीशीर अनुभव येत आहे. काही निर्लज्य ग्रामस्थ मात्र गाडी आली तरी समोर बसून बोलून आम्हाला लाभ मिळालेला नाही. आम्हाला माहीत नाही, असे सांगत होते म्हणून ग्रामसेवक व पदाधिकाºयांची बैठक घेऊन अपूर्ण प्रस्ताव आणि नवीन प्रस्ताव मागवून अनुदान घेऊन बांधकाम न करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महिन्यातच प्रलंबित असलेले साडेचार हजार शौचालय बांधण्यात आले आणि नवीन १२६३ नवीन प्रस्ताव नोंदले गेले आणि नोंदणी सुरू आहे.
यासोबतच त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शालेय विद्यार्थी, खाजगी स्वयंसेवक आदींची मदत घेऊन प्रबोधन तसेच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. महिला स्वयंसेवकांनी स्वत: स्वच्छता सुरू करून उघड्यावर शौचास जाणाºयांना अडवून प्रबोधन जनजागृती करणे सुरू केले आहे.

Web Title: The slopes of those who sat on the floor saying "unres ... unres ..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.