बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:51 PM2018-12-02T15:51:28+5:302018-12-02T15:58:10+5:30
गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत.
यावल, जि.जळगाव : गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत.
गेल्या २२ आॅक्टोबरला बºहाणपूर येथे २१५० रुपयांच्या भावाचा २०१८ चा उच्चांक गाठला होता तर १ डिसेंबरसाठी ते केळी भाव १०२५ असे घसरले. म्हणजे अवघ्या सव्वा महिन्यात बºहाणपूर येथे केळी भावात निम्म्यापेक्षाही जास्त घसरण झाली. बºहाणपूर येथे एकूण ८६ ट्रकची आवक होऊन १ तारखेसाठी उच्च केळीचे भाव १०२५ असे घसरले. सर्वसाधारण भाव ७०० रुपयापासून १०२५ असे राहिल्याने उच्च केळी भाव जिल्ह्यापेक्षा कमी झाले आहे.
रावेरसह जिल्ह्यात ती केळीवर मंदीची लाट आली आहे. रावेर येथे १ नोव्हेंबरला केळीचे भाव १२४० रुपये फरक २० असे होते. नंतर २ नोव्हेंबरपासून तेथे केळी भावात घसरण झाली आणि पाहता पाहता एका महिन्यात फरकासहीत केळी भावात २१९ रुपयाची घसरण झाली. रावेर येथे केळी भाव १०४५ रुपये फरक १६ असे घसरले.
रावेरसह जळगाव आणि चोपडा येथेही केळी भाव घसरुन मंदीची लाट आली आहे. जळगाव कांदे बाग १००५ फरक १४, तर चोपडा कांदेबाग ९९५ फरक १४ असे घसरले. केळीच्या मागणीत झालेली घट आणि थंडीची लाट यामुळे मंदीची लाट आल्याचे बोलले जात आहे.
जळगाव आणि चोपडा येथे गेल्यावर महिन्यापासून कांदे बागाचे स्वतंत्र भाव काढणे सुरू आहे. मात्र अद्याप रावेर येथून कांदेबागाचे स्वतंत्र भाव नसल्याने कांदे बागाला जुनारी केळी भाव मिळत आहे. रावेर व यावल तालुक्यात कांदे बागाची लागवड कमी असते. यावल तालुक्यात मात्र चांगली लागवड होत असून कापणी सुरू आहे. म्हणून कांदे बागचे स्वतंत्र भाव काढण्यात यावे.