चोपड्यानजीक छोटे विमान कोसळले, एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 05:47 PM2021-07-16T17:47:44+5:302021-07-16T17:48:32+5:30
अपघातात प्रशिक्षणार्थी महिला बचावली
चोपडा जि.जळगाव : शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्राचे विमान डोंगरावर
कोसळून एक जण ठार तर महिला प्रशिक्षणार्थी बचावली आहे. ही थरारक
घटना वर्डी ता. चोपडानजीक शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या छोट्या विमानात पायलट आणि एक
महिलाप्रशिक्षणार्थी असे दोन जण होते. हे विमान चोपडयापासून दहा किमी
अंतरावर वर्डी गावाजवळील सातपुडा पर्वतरांगात असताना अचानक पंखा
तुटला. त्यामुळे हे विमान समोरच्या ध्वज बरडी डोंगरावर जाऊन आदळले
आणि खाली पडले. मोठा आवाज झाल्याने काही अंतरावर असलेल्या
झोपडीमधील लोक तिकडे धावले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत जखमी
महिलेस बाहरे काढले. ठार झालेल्याचे नाव समजू शकले नाही.