जळगावातील विद्यार्थ्यांनी तयार केले स्मार्ट सीटीचे मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 07:51 PM2018-06-23T19:51:56+5:302018-06-23T19:54:42+5:30
एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
जळगाव : एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी मधील महत्वाची उद्दिष्टे
हा प्रकल्प पूर्णपणे आॅटोमॅटिक असून तो आजच्या काळाच्या आय.ओ.टी संकल्पनेवर आधारित आहे. यात प्रामुख्याने घर स्वयंचलन, वीजनिर्मिती आणि वाहतूक नियंत्रण ही तीन उद्दिष्टे समाविष्ट करण्यात आली आहे.
शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी कोमल पाटील, मयूर पाटील, मोनिका राजपूत, प्रेरणा साळी यांनी हा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांना प्रा. प्रियंका शानभाग, प्रा.अमोल वाणी व विभागप्रमुख डॉ. एस.आर. सुरळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व सुरक्षा युक्त अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर
स्मार्ट सिटी मॉडेलमध्ये सर्व सुरक्षा सुविधांनी उपयुक्त असलेले अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रोग्राम आणि हार्डवेअरच्या मदतीने बनविले आहे. या अॅप्लिकेशनचा गाभा ओर्डिनो आहे. ओर्डिनो हा कमी ऊर्जेवर कार्यरत होत असल्यामुळे आवश्यक तेवढीच ऊर्जा पुरवण्यासाठी स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला आहे. सुरक्षा आणि नियंत्रणाच्या दृष्टीने एल.डी.आर., टेम्परेचर आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर वापरले आहेत. घराच्या सुरक्षिततेसाठी आरएफआयडी टॅग व रीडर वापरण्यात आले आहे. सर्व प्रोजेक्ट उपकरण आणि ओर्डिनो व वाय-फाय मोड्युल्ड हे मोबाईल फोनला जोडण्यात आले आहे. गतिरोधक पार करत असतांना ऊर्जा निर्मिती साठी लोड सेल्सचा वापर केला आहे.
अचानक आग लागल्यास मोबाईवर येणार संदेश
घरात अचानक आग लागल्यावर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण सक्रिय होऊन भोंगा वाजेल व मोबाईलवर संदेश येईल. सुरक्षा उद्देशामध्ये अधिकृत आणि अनधिकृत कार्डचा वापर केला असून आरएफआयडी रीडर सुरक्षा उपकरणाला जोडलेला आहे. वाहतूक नियंत्रण यात प्रामुख्याने पार्किंग समस्येला लक्षात घेऊन बनविली आहे. यामध्ये पार्किंग जागा रिकामी आहे हे एलसीडी डिस्प्लेवर सूचित करण्यात येईल.
घर्षणामुळे होणार वीजनिर्मिती
अपघात नियंत्रण दृष्टीने एलसीडी डिस्प्लेवर ट्रॅफिक हालचाल सुरक्षा सूचित करण्यात येईल. ज्यामुळे वेळेची बचत होईल. गतिरोधक पार करत असतांना वाहन आणि रोड यांच्यात होणाऱ्या घर्षणामुळे वीजनिर्मिती होते. या विजेचा वापर आॅटोमॅटिक स्ट्रीट लाईटसाठी करण्यात येईल. ज्यामुळे विजेची बचत करता येईल.