‘स्मार्ट व्हीलेज’ साठी 13 गावांचे सर्वेक्षण सुरु

By admin | Published: August 25, 2015 10:37 PM2015-08-25T22:37:36+5:302015-08-25T22:37:36+5:30

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘स्मार्ट व्हीलेज’ ही संकल्पना खान्देशात राबविण्यात येणार आहे.

For the 'Smart Village' 13 villages survey started | ‘स्मार्ट व्हीलेज’ साठी 13 गावांचे सर्वेक्षण सुरु

‘स्मार्ट व्हीलेज’ साठी 13 गावांचे सर्वेक्षण सुरु

Next

जळगाव :   उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘स्मार्ट व्हीलेज’ ही संकल्पना खान्देशात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागातर्फे सूचित केल्यानुसार खान्देशातील 13 गावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणाचा अहवाल 30 ऑगस्टर्पयत विद्यापीठाने मागविला असून त्यातून पाच गावांची निवड होणार आहे.
विद्यापीठाच्या या योजनेंतर्गत पाच गावांची निवड झाल्यानंतर या गावांमध्ये पायाभूत सुविधा, मुलांना दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणाच्या संधी मिळण्यासाठी नानाविध प्रयोग केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक गावांना वार्षिक 20 लाख रुपयांचा निधी विद्यापीठातर्फे मिळणार आहे.
मंगळवारी विद्यापीठात बैठक झाली.  बैठकीत ‘स्मार्ट व्हीलेज’ ही संकल्पना राबविण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू आहे. त्याचे काम किती झाले. याचा आढावा कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी घेतला.
प्रत्येक गोष्टींची होणार नोंद
सर्वेक्षणासाठी विद्यापीठातर्फे जी टिम नियुक्त करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील बारीक-सारीक गोष्टींची नोंद या टिम मधील सदस्य घेणार आहेत. गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या, मूलभूत सोयी-सुविधांबाबतचा आढावा, विद्याथ्र्याची गुणवत्ता, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, गावात ग्रामपंचायत असेल तर त्यातील सदस्यांची माहिती घेतली जाणार आहे.

या गावांमध्ये सर्वेक्षण
 भामेर (साक्री, जिल्हा धुळे), चांदवड (शिंदखेडा), चांदसैनी, राजबर्डी (धडगाव, नंदुरबार), राजवीर (तळोदा), भगदर(अक्कलकु वा), जामन्या-गाड:या (यावल), सावदे (एरंडोल), चारठाणा (मुक्ताईनगर), मानमोडी (बोदवड), धूरखेडा (धरणगाव), रामनगर (चाळीसगाव).

Web Title: For the 'Smart Village' 13 villages survey started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.