कोण आहे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा, २४ तासाच्या आत नराधम जाळ््यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 01:01 PM2020-07-12T13:01:30+5:302020-07-12T13:16:13+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाºया सौरभ वासुदेव खर्डीकर (२५, रा.राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या. त्याने पोलीस अधीक्षकांच्या समोरच गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गोलाणी मार्केटच्या तिसºया मजल्या १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरदिवसा अल्पवयीन मुलीवर असा प्रसंग बेतल्याने पोलिसांनी हा विषय गांभीर्याने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून तपासासाठी वेगवेगळे पथके तयार केली. शहरात खबऱ्यांचे जाळे व दांडगा संपर्क असणारे स्थानिक गुन्हे शाखेचे ११ कर्मचारी बापू रोहोम यांनी या कामासाठी निवडले आणि याच कर्मचाºयांनी २४ तासाच्या आत संशयिताच्या मुसक्याही आवळल्या.
असा निष्पन्न केला संशयित
स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील,सुधाकर अंभोरे, अनिल इंगळे, संतोष मायकल, अशरफ शेख, रामचंद्र बोरसे, रमेश चौधरी व मनोज दुसाने यांच्या पथकाने शनिवारी सकाळपासूनच खबºयांमार्फत माहिती काढायला सुरुवात केली, त्यानंतर गोलाणी मार्केटमधील दुकानदारांना बोलावून त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुसºया मजल्यावरील एका वकीलाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ११.५५ वाजता एका तरुणाच्या मागे पीडित मुलगी चालत असल्याचे कैद झाले.या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी संशयिताचे नाव निष्पन्न केले. त्याला ओळखणाºया एका तरुणाला सोबत घेऊनच पोलिसांनी कानळदा रस्त्यावरील राधाकृष्ण नगर गाठले. तेथे सौरभ हा वडीलांसोबत जेवण करीत होता. तेथून ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली.