‘एक्झिट पोल’नंतर सोशल मीडियावर धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:30 PM2019-05-21T12:30:31+5:302019-05-21T12:31:02+5:30
मीम्स’ व्दारे अनेकांवर साधला जातोय निशाणा
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व टप्पे संपल्यानंतर रविवारी विविध वृत्तवाहिन्या व संस्थाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपा व मित्रपक्षांना बहुमत मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. ‘एक्झिट पोल’ नंतर सोशल मीडियावर मोदी भक्तांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली असून, गमतीशीर ‘मीम्स’व्दारे विरोधकांवर निशाना साधला जात आहे.
सोशल मीडियावर कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया ही तत्क ाळ उमटत असून, त्यातच ती घटना जर लोकसभा निवडणुकीची असेल तर सर्वच सोशल मीडिया साईट्सवर ती घटना ट्रेंड करायला सुरुवात होते. रविवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचे अंदाज व्यक्त होवू लागताच, गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ एकमेकांचे उणे-दुणे काढत, अंतीम निकालाची प्रतीक्षा करणारे मोदी भक्त व त्यांच्या विरोधकांमध्ये सोशल मिडियावर चांगलेच धुमशान सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
एक्झिट पोलचा आधार घेवून मोदी भक्त सोशल मीडियावर ‘अब की बार’चा जयजयकार करत आहेत. तर विरोधकांकडून एक्झिट पोल कसे खोटे ठरतात या संदर्भातील जुने दाखले देत आहेत. मात्र, यामध्ये मोदी समर्थक व विरोधकांकडून तयार केले जात असलेले गमतीशीर ‘मीम्स’ लक्ष वेधून घेताना दिसून येत आहेत.
सोशल मीडियावर गमतीशीर संदेश व ‘मीम्स’
गुलामांनो....
चला-विधानसभेच्या तयारीला लागू या
एक्झिट पोल काहीही लागू दया...
निकाल काहीही लागू दया...
आपल्या पोस्ट काही बंद नाही पडायच्या
क्यों ना पहले शपथ विधी हो जाये ,
बाकी चुनाव के नतीजे और सब फॉरमैलिटी
शपथ विधी के बाद होती रहेगी.
एक्झिट पोल में कांग्रेस को बडी जीत।
७२,००० रू. नहीं देने पड़ेंगे।
बच गये...पुराने नोट
२३ ला २ बस लागतील ...
जर हे आले तर एक बस पाकिस्तानला ...
जर ते आले तर दुसरी बस बाबा केदारनाथला
लाव रे तो व्हिडीओ नंतर ...
लाव रे ते एक्झिट पोल ..
एक्झिट पोलनंतर सर्वात जास्त काळ भावी पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती म्हणून पवार साहेबांचं नाव गिनीज बुक मधे नोंद केलं जाणार आहे ...???? त्यात आणखी ५ वर्षे भर
ये एक्झिट पोल वाले भी बहुत बदमाश है ?? कम से कम २३ मई तक तो चैन से सोने देते ?
कहो दिल से मोदीजी फिरसे
हलवाई भी काँग्रेसियो के २३ मई के लड्डू के आॅर्डर नही ले रहे। हलवाई कह रहे है कि पूरा १०० टक्के एडवांस दो तब बनायेंगे.